Rozgar Mela : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दुपारी 4 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग रोजगार मेळावा घेणार आहेत. यात नुकत्याच नियुक्त झालेल्या 51 हजारांहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना अपॉइंटमेंट लेटर देणार आहेत. या कार्यक्रमात नियुक्त झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांशी पंतप्रधान मोदी संवादही साधणार आहेत. दुसरीकडे उद्याच तेलंगणामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत असल्याने या कार्यक्रमाच्या टायमिंगवरून विरोधकांकडून शंका उपस्थित केली जात आहे.
केंद्र सरकारच्या रोजगार मेळाव्यात आतापर्यंत पंतप्रधान मोदींच्या हस्ते हजारो नागरिकांना सरकारी नोकरी देण्यात आली आहे. असाच रोजगार मेळावा उद्या होत आहे. हा मेळावा देशात 37 ठिकाणी आयोजित करण्यात आला. देशभरातून निवड झालेल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही गृह मंत्रालय, महसूल, उच्च शिक्षण, अर्थ, संरक्षण, आरोग्य, कामगार मंत्रालयासह इतर सरकारी विभागात करण्यात येणार आहे. या कर्मचाऱ्यांना ऑनलाइन प्रशिक्षणही दिले जाणार आहे. ( Telangana Election )
तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान
तेलंगणा विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी उद्या राज्यात मतदान होणार आहे. दुसरीकडे, पंतप्रधान मोदी हे 51 हजार नागरिकांना सरकारी नोकरीचे पीएम अपाइंटमेंट लेटर देणार आहेत. यापूर्वी 15 नोव्हेंबर 2023 ला पीएम किसान सन्मान निधीचा 15 वा हप्ता देशातील शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आला होता. याचा लाभ देशातील 8 कोटी शेतकऱ्यांना झाला. एकूण 18000 कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आले. त्यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी टायमिंगवरून सवाल उपस्थित केला होता. कारण त्याच्या दोन दिवसांनी 17 नोव्हेंबरला मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये मतदान होणार होते. निवडणुकीच्या बरोबर दोन दिवस आधी शेतकऱ्यांना निधी कसा काय दिला गेला. शेतकऱ्यांना निधी देण्यात जाणूनबुजून दिरंगाई केली गेली, असा आरोप जयराम रमेश यांनी केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.