PM Narendra Modi Sarkarnama
देश

Lok Sabha Election 2024 : माझ्या 90 सेकंदांच्या भाषणाने काँग्रेस अन् आघाडी घाबरली! मोदींचा पुन्हा हल्लाबोल

PM Narendra Modi News : काँग्रेसने माता-भगिनींचे मंगळसूत्र, संपत्ती काढून घेणार असल्याचे विधान मोदींनी दोन दिवसांपूर्वी केले होते. त्यानंतर काँग्रेससह विरोधकांनी मोदींवर जोरदार टीका केली होती.  

Rajanand More

Rajasthan News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी राजस्थानमध्ये केलेल्या विधानावरून देशातील काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. (Lok Sabha Election 2024) माता-भगिनींचे मंगळसूत्र आणि सर्वांची संपत्ती गोळा करून घुसखोर आणि मुस्लिमांना दिली जाणार असल्याचे विधान मोदींनी केले आहे. आज पुन्हा त्यांनी काँग्रेसवर पलटवार करत हिंमत असेल तर तुमचे धोरण मान्य करा, असे आव्हान मोदींनी दिले.

राजस्थानमध्ये आज मोदींची (PM Narendra Modi) लोकसभा निवडणुकीची प्रचार सभा झाली. मोदी म्हणाले, मी दोन दिवसांपूर्वी राजस्थानमध्ये आलो होतो. त्यावेळी मी भाषणादरम्यान 90 सेकंदांत देशासमोर एक सत्य मांडले. त्यावरून काँग्रेस (Congress) आणि इंडी आघाडीमध्ये (India Alliance) घबराट निर्माण झाली.

तुमची संपत्ती ओरबाडून घेत काही खास लोकांना देण्याचे षडयंत्र काँग्रेसकडून रचले जात असल्याचे सत्य मी देशासमोर मांडले होते. मी त्यांची व्होट बँक आणि ध्रुवीकरणाच्या राजकारणाचा पर्दाफाश केला. काँग्रेस याला का घाबरत आहे, असा सवालही मोदींनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दिल्लीत काँग्रेसचे सरकार असते तर काय झाले असते, असा सवाल करत मोदी म्हणाले, दिल्लीमध्ये सेवा करण्याची संधी 2014 तुम्ही मला दिली. कुणीही विचार केला नसेल असे निर्णय देशाने घेतले. पण 2014 मध्ये दिल्लीत काँग्रेसचे सरकार आले असते तर आजही जम्मू-काश्मीरमध्ये आपल्या सैनिकांवर दगडफेक होत राहिली असती. शत्रू सीमापार करून आले असते. वन रँक वन पेन्शन (One Rank One Pension) मिळाली नसती.

2004 मध्ये केंद्रात काँग्रेसची सत्ता आल्यानंतर त्यांचे पहिले काम आंध्र प्रदेशात एससी आणि एसटीचे आरक्षण कमी करून मुस्लिमांना देण्याचे होते. देशात त्याची अंमलबजावणी करण्याचा तो एक पायलट प्रोजेक्ट होता. 2004 ते 2010 या काळात काँग्रेसने आंध्र प्रदेशात तसा प्रयत्नही केला. पण सुप्रीम कोर्टामुळे ते शक्य झाले नाही, असा आरोपही मोदींनी या वेळी केला. 

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT