Lok Sabha Election News : मुकेश दलाल पहिले नाहीत; यशवंतराव चव्हाणांसह अनेक बडे नेते बिनविरोध गेलेत संसदेत

Mukesh Dalal News : सुरत मतदारसंघातून मुकेश दलाल हे बिनविरोध विजयी झाले आहेत. काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानंतर इतर आठ उमेदवारांनीही निवडणुकीत माघार घेतल्याने दलाल यांचा मार्ग मोकळा झाला.
Farooq Abdillah, Dimpal Yadav, Yashwantrao Chavan
Farooq Abdillah, Dimpal Yadav, Yashwantrao ChavanSarkarnama

New Delhi News : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election News) दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाआधीच भाजपचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. ना मतदान, ना मतमोजणी... त्याआधीच भाजपला एक खासदार मिळाला आहे. सुरत मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मुकेश दलाल भाजपचे पहिले खासदार बनले आहेत. पण खासदारांचा असा बिनविरोध विजय पहिल्यांदाच झालेला नाही. देशाचे माजी संरक्षणमंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी निवडणूक बिनविरोध जिंकली आहे.

मुकेश दलाल (Mukesh Dalal) हे भाजपचे (BJP) देशातील पहिले खासदार ठरले आहेत. त्यांच्या विजयामुळे भाजपच्या विजयाची घाेडदौड मतमोजणीआधीच सुरू झाली आहे. काँग्रेसचे (Congress) उमेदवार नीलेश कुंभाणी यांचा अर्ज बाद झाल्यानंतर उर्वरित आठ उमेदवारांनीही निवडणुकीतून माघार घेतली. परिणामी, दलाल यांच्या विजय निश्चित झाला.

Farooq Abdillah, Dimpal Yadav, Yashwantrao Chavan
Lok Sabha Election 2024 : निवडणुकीत भाजपचा पहिला विजय; गुजरातमध्ये मोठी राजकीय घडामोड...

दलाल हे बिनविरोध विजयी होणारे पहिले खासदार नाहीत. लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीपासून आतापर्यंत 30 हून अधिक खासदार बिनविरोध संसदेत गेले आहेत. त्यामध्ये यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan), जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांचाही समावेश आहे. 1962 मध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली होती. या निवडणुकीत यशवंतराव चव्हाण बिनविरोध निवडून आले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

1962 मध्ये चीनशी झालेल्या युद्धानंतर त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले यशवंतराव चव्हाण यांना पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी दिल्लीत बोलवून संरक्षणमंत्रिपद दिलं होतं. ही जबाबदारी देत असताना त्यांना खासदार म्हणून निवडून येणे आवश्यक होते. त्यावेळी नाशिक मतदारसंघातून ते बिनविरोध निवडून गेले होते.

मागील दोन निवडणुका याला अपवाद ठरल्या आहेत. या निवडणुकांमध्ये किंवा दहा वर्षांतील पोटनिवडणुकांमध्ये एकही उमेदवार बिनविरोध विजयी झालेला नाही. याआधी 2012 मध्ये समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव कनौज मतदारसंघातून बिनविरोध विजयी झाल्या होत्या.

Farooq Abdillah, Dimpal Yadav, Yashwantrao Chavan
Arvind Kejriwal News : केजरीवालांच्या जामिनावर त्यांच्याच वकिलांनी घेतला आक्षेप; नेमकं काय घडलं कोर्टात?

अखिलेश यादव यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत डिंपल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण त्यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज मागे घेण्यापर्यंत एकही उमेदवार उरला नाही. त्यामुळे त्यांना विजयी घोषित करण्यात आले होते.

दरम्यान, 1951 मध्ये लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीत दहा उमेदवार बिनविरोध विजयी झाले होते. तर 1957 मध्ये हा आकडा 11 वर पोहाेचला होता, तर 1962 आणि 1967 मध्ये अनुक्रमे तीन आणि पाच उमेदवार विजयी झाले होते. 1971, 1977 आणि 1984 या निवडणुकांमध्येही प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाला होता. 

R

Farooq Abdillah, Dimpal Yadav, Yashwantrao Chavan
Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान मोदींना काँग्रेस विचारणार जाब; काय आहे कारण?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com