PM Narendra Modi Sarkarnama
देश

PM Narendra Modi News : लवकरच काँग्रेसमधील गृहकलह रस्त्यावर! पंतप्रधान मोदींचं भाकित

Congress News : कर्नाटकमध्ये पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर हल्ला चढवला. पराभवाचे खापर एकमेकांवर फोडण्यासाठी काँग्रेसमधील विविध गटांतील कलह रस्त्यावर येणार असल्याची टीका त्यांनी केली आहे.

Rajanand More

Karnataka News : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (PM Narendra Modi News) लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा झंझावत सुरू आहे. रविवारी कर्नाटकात झालेल्या सभांमध्ये त्यांनी काँग्रेस व कर्नाटक सरकारवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी त्यांनी पुन्हा व्होट बँकेच्या मुद्यावर काँग्रेसला धारेवर धरले. तसेच काँग्रेसमधील अंतर्गत कलहावरही त्यांनी थेट भाष्य केले. लवकरच पक्षातील गृहकलह रस्त्यावर येणार असल्याचे भाकित त्यांनी वर्तवले.

पंतप्रधान मोदींनी बल्लारी येथे प्रचारसभा झाली. काँग्रेसवर टीका करताना मोदी म्हणाले, काँग्रेसमधील (Congress) विविध गटांमधील अंतर्गत कलह आता लवकरच रस्त्यावर येणार आहे. निवडणुकीतील पराभवाचे खापर हे सर्व गट एकमेकांवर फोडताना दिसतील, असे भाकित मोदींनी वर्तवले. (Lok Sabha Election 2024)

कर्नाटकातील (Karnataka) काँग्रेस सरकारने लांगुलचालनाच्या राजकारणासमोर गुडघे टेकले आहेत. ही मानसिकता कर्नाटक आणि देशासाठी घातक आहे. गुन्हेगारी आणि दहशतवादाला व्होट बँकेच्या तराजूत तोलले जाऊ शकत नाही. पण काँग्रेस व्होट बँकेच्या (Congress Vote Bank) विचारातून बाहेर येण्यासाठी काहीही शिकण्यास तयार नाही, अशी टीका मोदींनी केली.

 (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पीएफआय (PFI) एक घातक संघटना आहे. या संघटनेने देशाविरोधात मोठे षडयंत्र रचले आहे. सरकारने हिंमत दाखवून या संघटनेवर बंदी घातली. पीएफआयला हिंदुस्तानात आपली मनमानी करू न देण्याचा निर्णय घेतला. पण देशासाठी एवढी घातक पीएफआय आज काँग्रेससाठी लाईफलाईन बनली आहे. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे बेंगलुरूतील कँफेमध्ये बॉम्बस्फोट झाला, असा निशाणा मोदींनी काँग्रेसवर साधला.

आज भारत वेगाने पुढे जात असताना काही देशांना आणि सघटनांना ते आवडत नाही. अनेक लोकांना भारतातील सरकार कमजोर असावे, असे वाटत आहे. कमजोर सरकारमध्ये त्यांची कामे कोणत्याही अडथळ्यांशिवाय व्हावीत, असे वाटते. काँग्रेसला भ्रष्टाचारासाठी मोकळे रान मिळेल. पण अशा लोकांसाठी भाजपचे मजबूत सरकार आव्हान बनले आहे. आम्हाला कुणीही गुडघ्यावर टेकवू शकत नाही. आता काँग्रेसची कोणतीही नीती काम करणार नाही, असे मोदी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT