Sanjay Singh News : भाजपमध्ये चालते भागवतांचे संविधान! संजय सिंह यांचा घणाघात

BJP Political News : आरक्षणाच्या एका व्हायरल व्हिडीओवरून संजय सिंह यांनी भाजपवर टीका केली आहे. संविधान बदलण्यासाठीच भाजपला 400 जागा हव्या आहेत, असे ते म्हणाले.
Sanjay Singh, Mohan Bhagwat
Sanjay Singh, Mohan BhagwatSarkarnama

New Delhi News : दिल्ली मद्य धोरण घोटाळाप्रकरणात अनेक महिने जेलमध्ये राहून बाहेर आलेले आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह (Sanjay Singh News) यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी संविधान आणि आरक्षणाच्या मुद्यावरून भाजप आणि आरएसएसला घेरले आहे. भाजपला संविधान बदलायचे आहे. आरक्षण संपवायचे आहे, यासाठी ४०० जागा जिंकायच्या आहेत, अशी टीका संजय सिंह यांनी केली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) चे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या एका व्हिडीओचा संदर्भ देत संजय सिंह यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, पहिल्यांदाच आसे झाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांना पुढे येऊन खुलासा करावा लागला आहे.

भाजपची (BJP) मानसिकता आता समोर आली आहे. आरएसएसकडून खुलासा केला जात आहे. आम्ही म्हणत आलो आहोत, देशात बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान चालते. पण भाजपमध्ये भाजप यांचे संविधात चालते. आरक्षण संपावे असे भाजप म्हणत असल्याची टीका सिंह यांनी केली आहे.

 (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करताना संजय सिंह म्हणाले, भाजप 50 वर्षे सत्तेत असेल, असे अमित शाह म्हणत आहेत. याचा अर्ज ते निवडणुका घेणारच नाहीत. भाजपला 400 जागा का हव्या आहेत, याचे कारण निवडणुकाच होऊ द्यायच्या नाहीत, हे आहे. त्यांना संविधान बदलायचे आहे, आरक्षण संपवायचे आहे, अशी टीका सिंह यांनी केली.

मोहन भागवत यांचे स्पष्टीकरण

मोहन भागवत यांचा आरक्षणाबाबतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये आरक्षण बंद करण्याबाबत बोलले जात आहे. त्यावर रविवारी भागवत यांनी एका कार्यक्रम स्पष्टीकरण दिले आहे. एक बनावट व्हिडीओ चालवला जात आहे. संघ आरक्षणाच्या बाजूने असल्याचेही भागवत यांनी सांगितले.

Sanjay Singh, Mohan Bhagwat
Prajwal Revanna : प्रचाराच्या रणधुमाळीत 'सेक्स स्कँडल'..! देवेगौडांना 'या' नातूनं आणलं अडचणीत

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com