Lok Sabha Election 2024 : शिवसेनेनंतर निवडणूक आयोगाचा ‘आप’लाही दणका; प्रचारगीत खटकले

Election Commission : आयोगाने काही दिवसांपुर्वीच शिवसेनेच्या मशाल गीतावर आक्षेप घेत हिंदू आणि भवानी हे शब्द वगळण्यास सांगितले आहे.
Election Commission, AAP, Shiv Sena
Election Commission, AAP, Shiv SenaSarkarnama

New Delhi News : केंद्रीय निवडणूक आयोगाने आम आदमी पक्षाला ऐन लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) रणधुमाळीत झटका दिला आहे. आयोगाने पक्षाच्या प्रचारगीतावर आक्षेप घेतला आहे. त्यावरून पुन्हा एकदा आप आणि भाजप आमनसामने उभे ठाकले आहेत. प्रचारगीतामध्ये काहीही आक्षेपार्ह नसताना आयोगाने आक्षेप घेतल्याचा आरोप आपच्या नेत्यांकडून केला जात आहे. ही केंद्र सरकारची हुकूमशाही असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

आपने (AAP) नुकतेच प्रचारगीत लॉन्च केले आहे. दोन मिनिटांच्या या गीतामध्ये सध्या जेलमध्ये असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal), माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया हेही दिसतात. आपचे नेते आमदार दिलीप पांडेय यांनीही हे गीत लिहिले आहे. या गीतावर आक्षेप घेण्यात आल्यानंतर आपच्या नेत्या आणि मंत्री आतिशी यांनी केली आहे. 

Election Commission, AAP, Shiv Sena
Lok Sabha Election 2024 : देवेगौडांचा खासदार नातू देश सोडून पळाला; व्हायरल अश्लील व्हिडीओ प्रकरण भोवणार...

आतिशी (Atishi) म्हणाल्या, गीतामधील ‘जेल का जवाब वोट से’ या ओळीवर निवडणूक आयोगाने (Election Commission) आक्षेप घेतला आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. आक्षेप घेण्यासारखे यामध्ये काहीही आक्षेपार्ह आहे. निवडणूक आचारसंहितेचा भंग कुठेही होत नाही. यात दाखविण्यात आलेली चित्र, व्हिडीओ सत्य आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निवडणूक आयोग ही एक प्रतिष्ठित संस्था आहे. टीएन शेषन आयुक्त असताना त्यांना आयोगाचा सन्मान अधिक वाढवला, असे सांगत आतिशी म्हणाल्या, 2024 च्या निवडणुकीत लोकशाही संपली, असे म्हणण्याची वेळ लोकांवर येणार नाही, असे काम आयोगाने करू नये. या निवडणुकीत आयोग निष्पक्ष राहिला नाही. आता भारताची निवडणूक पाकिस्तानची बनली आहे.

भाजपकडून आचारसंहितेचे उघडपणे उल्लंघन केले जात आहे. त्यावरही आयोगाने कारवाई करायला हवी. विरोधकांचा प्रचार थांबवणे आयोगाने बंद करावे, असे आवाहनही आतिशी यांनी केले. दरम्यान, आयोगाने प्रचारगीतावर आक्षेप घेताना म्हटले आहे की, निवडणुकीच्या प्रचारगीतातून न्यायव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जाऊ शकत नाहीत. कोणी जेलमध्ये असेल तर त्याचा संबंध न्यायव्यवस्थेशी असतो. त्यामुळे गीतातील काही शब्द बदलावेत, असे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, आयोगाने शिवसेनेच्या (Shiv Sena) (उध्दव ठाकरे) प्रचारगीतावर आक्षेप घेतला आहे. गीतातील हिंदू आणि भवानी हे शब्द वगळण्यास सांगितले आहे. त्याशिवाय या गीताला मंजूरी दिली जाणार नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. पण गीतातून हे शब्द काढून टाकणार नाही, अशी स्पष्ट भूमिका पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी घेतली आहे.  

Election Commission, AAP, Shiv Sena
Congress News : दिल्लीत काँग्रेसला झटका; पक्षांतर्गत वादातून अध्यक्षांचा राजीनामा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com