Sharad Pawar, Uddhav Thackeray, Narendra Modi Sarkarnama
देश

PM Narendra Modi News : मोदींकडून थेट शरद पवार अन् उद्धव ठाकरेंना 'एनडीए'त येण्याची ऑफर

Lok Sabha Election 2024 : शरद पवार यांनी एका मुलाखतीमध्ये छोटे पक्ष काँग्रेसमधील विलीन होतील, अशी संकेत दिले होते. त्यानंतर त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही काँग्रेसमध्ये विलीन होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Rajanand More

Mumbai News : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi News) यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना थेट 'एनडीए'मध्ये येण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळे राजकीय वुर्तळात चर्चांना उधाण आले आहे. शरद पवारांनी काही दिवसांपुर्वीच एका मुलाखतीत काही छोट्या पक्षांच्या काँग्रेसमधील विलीनीकरणावर भाष्य केले होते.

पंतप्रधान मोदींची शुक्रवारी नंदुरबार येथे प्रचार सभा झाली. या सभेत त्यांनी शरद पवारांच्या (Sharad Pawar) विधानाचा संदर्भ देत महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे वक्तव्य केले आहे. मागील दोन दिवस विलीनीकरणाचा मुद्दा तापलेला असतानाच मोदींच्या विधानामुळे चर्चेला पुन्हा तोंड फुटले आहे.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

महाराष्ट्रातील एका दिग्गज नेत्याने बारामतीतील (Baramati) निवडणूक संपल्यानंतर एक विधान केले आहे. ते इतके हताश आणि निराश झाले आहेत की, त्यांना वाटते चार जूननंतर राजकीय जीवनात टिकून राहायचे असेल तर छोट्या-छोट्या राजकीय पक्षांनी काँग्रेसमध्ये (Congress) विलीन व्हायला हवे, असे मोदी म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पुढे बोलताना मोदींनी थेट ऑफर दिली. ते म्हणाले, याचा अर्थ नकली एनसीपी आणि नकली शिवसेनेने (Shiv Sena) काँग्रेसमध्ये जाण्याचे ठरवले आहे. चार जूननंतर काँग्रेसमध्ये जाण्याऐवजी छातीठोकपणे अजितदादा आणि शिंदेंसोबत यावे, तुमची सर्व स्वप्न पूर्ण होतील, अशी ऑफर नरेंद्र मोदींनी दिली आहे.

पंतप्रधान मोदींच्या या विधानानंतर आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT