Loksabha Election : ईव्हीएम माझ्या बापाचे, भाजप नेत्याच्या मुलाच्या बोगस मतदानाचे लाईव्ह स्ट्रीमिंग

BJP : काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार दिली आहे. आरोपींनी 25 पोलिंग बुथचा दौरा केला. आणि गोथिबा तालुक्यातील संतरामपूर येथे बोगस मतदान केले.
Gujarat for casting bogus vote
Gujarat for casting bogus vote Sarkarnama

Loksabha Election : मतदानाच्या वेळी थेट मतदान केंद्रात घुसून ईव्हीएम माझ्या बापाचे आहे म्हणत बोगस मतदान करणाऱ्या भाजपच्या दोन सदस्यांना पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे बोगस मतदान करताना मतदान केंद्रावरच लाईव्ह स्ट्रीमिंगही केले होतं. ही घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल काँग्रेसने (Congress) निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली आहे.

Gujarat for casting bogus vote
Ajit Pawar News : मंत्री व्हायला निघाला.. आरं तू आमदारच कसा होतो तेच बघतो; अजितदादांचा अशोक पवारांना दम

काँग्रेसने Congress निवडणूक आयोगाकडे तक्रार दिली आहे. आरोपींनी 25 पोलिंग बुथचा दौरा केला. आणि गोथिबा तालुक्यातील संतरामपूर येथे बोगस मतदान केले. विजय भाभोर असे बोगस मतदान करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह त्याच्या एका सहकाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. बोगस मतदान करणारा विजयचे वडील भाजप कार्यकर्ते असून ते पंचायत समितीचे माजी सभापती देखील आहे.

विजय भाभोर याने संतरामपूरमधील गोबिथ येथे बोगस मतदान केले. मतदान केंद्रावर प्रवेश करताना भाभोरच्या सहकाराने त्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग केले. त्यामध्ये स्पष्ट दिसत आहे की, भाभोर हा ईव्हीएम मशिनसोबत छेडछाड करतो आहे तसेच निवडणूक Election अधिकाऱ्यालाही दमदाटी करतोय. फक्त आम्हाला 10 मिनिटे द्या, आम्ही इथेच बसून आहोत. ही ईव्हीएम मशिन माझ्या वडिलांची आहे, असे म्हणत आरोप भाभोर हा इतरही सहकाऱ्यांना कमळाचे बटण दाबण्याचा आग्रह करतो. या क्षेत्रात आपला दबदबा असल्याचे सांगत ईव्हीम मशिनसोबत नाचताना आरोपी भाभोर दिसून येतो.

Gujarat for casting bogus vote
Prithviraj Chavan News : भाजपला बहुमत मिळणे अशक्यच; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितली 'ही' कारणं...

जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट

भाजपच्या राजवटीत गुजरातमधील दाहोड येथे ईव्हीएम हायजॅक करून मतदान करताना लाईव्ह स्ट्रीम करण्यापर्यंत भाजप उमेदवाराच्या मुलाची मजल जाते, ही अतिशय गंभीर बाब आहे. लोकशाहीत हे कदापी शक्य नाही आणि सहन केले जाणार नाही. हुकूमशाही आम्ही येऊ देणार नाही. भाजप 'चारशे पार'चा नारा कशाच्या बळावर देतंय माहित नाही, पण या असल्या लोकशाही विरोधी कृत्यातून ते आपला खरा आणि भेसूर चेहरा जगाला दाखवून देत आहेत,हे मात्र नक्की, असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com