PM Narendra Modi Sarkarnama
देश

PM Narendra Modi News : पंतप्रधान मोदींच्या जम्मू-काश्मीरसाठी दोन मोठ्या घोषणा

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आज पहिल्यांदाच मोदी जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. उधमपूर येथे त्यांनी सभा घेत विधानसभा निवडणुकीचे संकेत दिले.

Rajanand More

Jammu and Kashmir News : जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर तिथे निवडणुका झालेल्या नाहीत. काश्मीरमधून लडाख वेगळे करत दोन्ही राज्यांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आलेला आहे. या अनुषंगाने आज लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काश्मीरच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi News) दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत.

राजकीय पक्षांकडून काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक घेण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. सुप्रीम कोर्टानेही निवडणूक आयोगाला याबाबत आदेश दिले आहेत. पुढील पाच-सहा महिन्यांत काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका (Assembly Election) होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने आज पंतप्रधानांनीही संकेत दिले.

उधमपूर येथील प्रचार सभेत बोलताना मोदी (PM Narendra Modi) म्हणाले, जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा दिला जाईल. लवकरच विधानसभेच्या निवडणुका होतील, या घोषणा त्यांनी केल्या. 2014 मध्ये मी याच ठिकाणी भाषण केले होते. त्यावेळी जम्मू-काश्मीरमधील लोकांचा त्रास दूर केला जाईळ, असे आश्वासन दिले होते. हे आश्वासन पूर्ण केले आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मी माझी गॅरंटी पूर्ण केली आहे. ही पहिलीच निवडणूक आहे, ज्यामध्ये सीमेपलीकडून दहशतवाद, दगडफेक आणि हल्ले हे निवडणुकीतील मुद्दे नाहीत. ही निवडणूक केवळ खासदार निवडून देण्यासाठी नाही तर केंद्रात मजबूत सरकार बनविण्यासाठी आहे, असे मोदींनी सांगितले.

माझ्यावर विश्वास ठेवा, हे मी दहा वर्षांपूर्वी म्हटले होते. अनेक दशकांपासून असलेल्या समस्यांचे मी निराकरण करेन, असे म्हटले होते. महिलांच्या मान-सन्मानाची गॅरंटी दिली होती. लोकांना पुढील पाच वर्षे मोफत रेशन मिळेल. येथील लोकांना आयुष्मान आराेग्य विमा मिळत आहेत. ठिकठिकाणी रस्ते तयार होत आहेत. मोबाईलची सुविधा पोहाेचली आहे. मोदींची गॅरंटी म्हणजे काम पूर्ण करण्याची गॅरंटी असल्याचे मोदी म्हणाले.

दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये लोकसभेच्या (Lok Sabha Election 2024) पाच जागा आहेत. पाचही जागांसाठी स्वतंत्र टप्प्यात मतदान होणार आहे. उधमपूर लोकसभेसाठी 19 एप्रिलला मतदान होणार आहे. त्यासाठी आज मोदींची पहिली सभा या मतदारसंघात झाली.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT