Delhi Liquor Scam Case : दिल्लीत राष्ट्रपती राजवट लावण्याची तयारी; नायब राज्यपालांची गृह मंत्रालयाला पत्रं

Arvind Kejriwal News : अरविंद केजरीवाल हे मागील 22 दिवसांपासून जेलमध्ये आहेत. त्यांनी अद्याप मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिलेला नाही. त्यावरून भाजपसह नायब राज्यपालांकडूनही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
Arvind Kejriwal
Arvind KejriwalSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : दिल्लीतील मद्य धोरण घोटाळाप्रकरणी (Delhi Liquor Scam Case) दिल्ली सरकारच्या मंत्री आतिशी यांनी गंभीर आरोप केले आहेत. अरविंद केजरीवाल सरकारविरोधात मोठे षडयंत्र रचले जात आहे. दिल्लीत राष्ट्रपती राजवट लावण्याची तयारी सुरू असून, नायब राज्यपालांकडून केंद्रीय गृह मंत्रालयाला आक्षेपार्ह पत्रं लिहिली जात असल्याचा आरोप आतिशी यांनी केला आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) मागील 22 दिवसांपासून जेलमध्ये आहेत. मात्र, त्यानंतरही त्यांनी पदाचा राजीनामा दिलेला नाही. त्यांना या पदावरून हटवावे, या मागणीसाठी दिल्ली हायकोर्टात (Delhi High Court) तीनदा याचिका दाखल करण्यात आली. पण कोर्टाने याचिका फेटाळून लावल्या, तर भाजप (BJP) व नायब राज्यपालांकडून केजरीवालांवर सातत्याने पदाचा राजीनामा न देण्यावरून टीका केली जात आहे.

Arvind Kejriwal
Lok Sabha Election 2024: इंडिया आघाडीच्या रडारवर भाजपचे चाळीस मतदारसंघ; 'चार सौ पार'चे गणित बिघडविणार...

या अनुषंगाने आज मंत्री आतिशी (Atishi) यांनी भाजपवर नवा आरोप केला आहे. त्या म्हणाल्या, आम्हाला विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे. पुढील काही दिवसांत भाजपशासित केंद्र सरकार दिल्लीत राष्ट्रपती राजवट लावणार आहे. कोणताही पुरावा नसताना केजरीवालांना खोट्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. लोकांनी निवडून दिलेले सरकार पाडण्याचे हे षडयंत्र आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दिल्लीत कोणत्याही अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जात नाही. प्रशासनात बदल्या होत नाहीत. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी बैठकांना येणेही बंद केले आहे. मागील एक आठवड्यापासून नायब राज्यपाल गृह मंत्रालयाला चुकीची पत्रं लिहित आहेत. केजरीवालांच्या खासगी सचिवांना हटवण्यात आले आहे. यावरून दिल्लीतील सरकार पाडण्यासाठी षडयंत्र रचले जात असल्याचे दिसते, असा आरोप आतिशी यांनी केला.

आपने फेब्रुवारी महिन्यात विधानसभेत बहुमत सिद्ध केले आहे. सत्तेत असलेल्या पक्षाकडे बहुमत असले तर राष्ट्रपती राजवटीचा आदेश दिला जाऊ शकत नाही. अरविंद केजरीवाल यांच्याजवळ विधानसभेत स्पष्ट बहुमत आहे. जर भाजपने दिल्लीत राष्ट्रपती राजवट लावली तर ती बेकायदेशीर असेल, असेही आतिशी म्हणाल्या.  

R

Arvind Kejriwal
Rajnath Singh News : आईच्या अंत्यविधीसाठीही पॅरोलवर सोडलं नाही; राजनाथ सिंह झाले भावूक

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com