Mallikarjun Kharge, PM Narendra Modi Sarkarnama
देश

Lok Sabha Election 2024 : अबकी बार 400 पार..! टीका करताना खर्गे हे काय बोलून गेले? मोदींनाही हसू आवरेना...

Rajanand More

New Delhi : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर संसदेत चर्चा सुरू आहे. शुक्रवारी राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खर्गे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थिती होती. खर्गे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले खरे पण त्यांच्या एका विधानामुळे सभागृहात जोरदार हशा पिकला. पंतप्रधान मोदींना हसू आवरले नाही. त्याचा व्हिडीओही सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहत म्हटले की, 'तुमच्याजवळ बहुमत आहे. आधी 330-340 होते. आता 400 पार जात आहे.' खर्गे यांच्या या विधानानंतर सत्ताधारी बाकांवरील खासदारांना हसू आवरले नाही. एकप्रकारे खर्गे यांनी भाजपच्या विजयावर खर्गेंनी शिक्कामोर्तबच केल्याच्या भावना भाजप (BJP) खासदारांच्या झाल्या होत्या. त्यामुळे त्यांनी या विधानाला हसून दाद दिली.

पंतप्रधान मोदीही (PM Narendra Modi) खर्गेंच्या विधानावर हसताना दिसते. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपने 400 पेक्षा अधिक जागांचे उद्दिष्ट ठेवले आहे. अबकी बार 400 पार अशी घोषणा दिली आहे. त्यावरून खर्गे यांनी भाजपला टोला मारला खरा पण बोलताना त्यांनी थेट 400 जागा मिळणार असल्याचे सांगितल्याने हशा पिकला होता. भाजपनेही याचा व्हिडीओ सोशल मिडीयात व्हायरल केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, मल्लिकार्जून खर्गे यांनी भाषणात बोलताना सांगितले की, ओबीसी (OBC) मुलांना २७ टक्के आरक्षण असून त्यांना ते मिळण्यात अडचणी येत आहेत. अशाचप्रकारे एससी आणि एसटीच्या मुलांचे आरक्षण (Reservation) कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोणतेही सरकार याची चौकशी करत नाही. पंडित नेहरूंनी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शिक्षणावर विशेष लक्ष दिले. त्यांनी प्राथमिक शाळा, कॉलेज, आयआयटी अशा संस्था सुरू केल्या. त्याचा फायदा सर्वांना व्हायला हवा, असेही खर्गे म्हणाले.

दरम्यान, सभागृहात देशाच्या फाळणीबाबत काँग्रेस खासदाराने केलेल्या विधानावर खर्गेंनी भाष्य केले. कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत एकच देश असावा, हीच आमची भूमिका आहे. कोणत्याही पक्षाचा नेता देश तोडण्याची भाषा करत असेल तर त्याला आमचे समर्थन नाही, असे खर्गे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT