Lok Sabha Election 2024 : बिहारमध्ये आता 'चिराग' पेटला; नितीशकुमारांमुळे भाजपला निवडणुकीत बसणार दणका?

Chirag Paswan : चिराग पासवान आणि नितीशकुमारांमधील राजकीय वैर भाजपची डोकेदुखी वाढवण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीतच त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता...
Chirag Paswan, Nitish Kumar
Chirag Paswan, Nitish KumarSarkarnama
Published on
Updated on

Bihar News : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमारांनी राष्ट्रीय जनता दलाशी काडीमोड घेत भाजपसोबत संसार थाटला. पण आता भाजपसोबत आधीपासूनच असलेल्या मित्रपक्षांमध्ये नाराजीची ठिणगी पडली आहे. त्याचा फटका थेट भाजपलाच बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी जागावाटपावरून उघडपणे भाजपला आव्हान देण्यास सुरूवात केली आहे. (Lok Sabha Election 2024)

मागील लोकसभा निवडणुकीत पासवान (Chirag Paswan) यांच्या पक्षाला एनडीएमध्ये सहा जागा मिळाल्या होत्या. आताही त्यांना तेवढ्याच जागा हव्या आहेत. 2019 च्या निवडणुकीत भाजपने 17 जागांवर निवडणूक लढवली होती. तर नितीशकुमारांच्या पक्षाला 17 जागा मिळाल्या होत्या. बिहारमध्ये (Bihar) लोकसभेच्या एकूण 40 जागा आहेत. सद्यस्थितीत भाजपसोबत उपेंद्र कुशवाह, जीतन राम मांझी आणि केंद्रीय मंत्री पशुपती पारस यांच्या पक्षाचाही समावेश आहे.

Chirag Paswan, Nitish Kumar
Jharkhand Politics : पिक्चर अभी बाकी है! नव्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेताच आमदार निघाले राज्याबाहेर अन् सोरेन कोठडीत...

पशुपती पारस हे चिराग पासवान यांचे काका असून रामविलास पासवान यांच्या निधनानंतर लोक जनशक्ती पक्षात फूट पडल्यानंतर दोघे स्वतंत्र झाले. लोकसभा निवडणुकीत भाजपला आपल्या कोट्यातूनच सर्व मित्रपक्षांना जागा द्याव्या लागणार आहेत. कारण नितीशकुमार (Nitish Kumar) आणि इतरांचे फारसे सख्य नाही. चिराग पासवान यांनी तर आपण एनडीएमध्ये असलो तरी नितीशकुमारांशी राजकीय वैर कायम राहील, असे स्पष्ट केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपने चिराग पासवान यांना नितीशकुमारांना गळ घालण्यास सांगितल्याचे समजते. नितीशकुमारांची ताकद कमी झाल्याने ते 17 पेक्षा कमी जागांवर समाधान मानू शकतात. त्यामुळे त्यांच्या कोट्यातून इतर मित्रपक्षांना जागा देण्याची भाजपची रणनीती असल्याचे समजते. या निवडणुकीत भाजपने अधिकाधिक जागा लढण्याची तयारी केली आहे. बिहारमध्येही यावेळी 17 पेक्षा अधिक जागांवर लढायचे असल्यास नितीशकुमारांच्या जागा कमी कराव्या लागणार आहेत, अन्यथा भाजपलाच मोठा फटका बसणार आहे.

...तर 23 जागांवर उमेदवार उतरवणार

चिराग पासवान यांनी भाजपला थेट आव्हान दिले आहे. 2019 प्रमाणे यावेळीही आपल्या पक्षाला लोकसभेच्या सहा जागा न मिळाल्यास राज्यातील 23 जागांवर उमेदवार उभे करू, असा इशारा त्यांनी दिला आहे. तसे झाल्यास ही भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकते. भाजपने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नितीशकुमारांना एनडीएमध्ये आणले असले तरी आता इतर मित्रपक्षांमुळे अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Chirag Paswan, Nitish Kumar
Actor Thalapathy Vijay News : सुपरस्टार थलापती विजयची राजकारणात एंट्री; लोकसभा निवडणुकीबाबत मोठी घोषणा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com