Tamil Nadu Political News: दक्षिणेतील सुपरस्टार थलापती विजयने अखेर शुक्रवारी राजकारणात एंट्री केली आहे. आपल्या अभिनयाने चाहत्यांना भुरळ पाडणाऱ्या विजयच्या राजकारणातील प्रवेशाने तमिळनाडूतील राजकीय गणितं बिघडणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नवीन राजकीय पक्षाची घोषणा करत विजयने इतर पक्षांचं टेन्शन वाढवलं आहे. (Actor Thalapathy Vijay News)
मागील काही दिवसांपासून थलापती विजय राजकारणात (Politics) प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा होती. अखेर शुक्रवारी त्याने सोशल मीडियातून याबाबत अधिकृत घोषणा केली. मागील आठवड्यात चेन्नईमध्ये विजयच्या फॅन क्लबची बैठक झाली होती. या बैठकीत राजकीय पक्ष स्थापन करण्यास हिरवा कंदील दाखवण्यात आला होता.
अभिनेताच विजयने सोशल मीडियात दिलेल्या माहितीनुसार, तमिलगा वेत्री कळघम (Tamilaga Vettri Kazhagam) या आमच्या पक्षाची नोंदणी करण्याचा अर्ज निवडणूक आयोगाला आज दिला जाणार आहे.
तमिळनाडूच्या (Tamil Nadu) 2026 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका हे आमचे लक्ष्य आहे. लोकांना राजकारणात हवे असलेले मुलभूत बदल घडवून आणण्यासाठी काम करणार असल्याचे विजय स्पष्ट केले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
माझ्यासाठी राजकारण हे दुसरे करिअर नाही. हे लोकांसाठी पवित्र काम आहे. खूप दिवसांपासून मी यासाठी तयारी करत आहे. माझ्यासाठी राजकारण हा छंद नाही. हे माझी मनापासूनची इच्छा आहे. मला राजकारणात झोकून द्यायचे आहे. सध्या प्रशासकीय अनियमितता, भ्रष्टाचारी राजकीय संस्कृती, जात-धर्माच्या नावाखाली लोकांना तोडण्याचे प्रयत्न होत आहेत, असेही विजयने म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीचे काय?
लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तोंडावर विजयने राजकीय पक्षाची घोषणा केल्याने या निवडणुकीत पक्षाचे उमेदवार उतरणार का किंवा कोणत्या पक्षाला पाठिंबा देणार, याबाबत उत्सुकता होती.
पण विजयने स्पष्ट केले आहे की, आपला पक्ष लोकसभा निवडणूक लढवणार नाही किंवा कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार आहे. राज्यातील विधानसभा निवडणुका आपले लक्ष्य असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. विजयचा दक्षिणेत मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे राजकारणात त्याला किती प्रतिसाद मिळतोय, हे लवकरच समजेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.