Lok Sabha Election 2024 : Narendra Modi Latest News : Sarkarnama
देश

Lok Sabha Election 2024 : वाराणसीतून पुन्हा एकदा नरेंद्र मोदी; यूपीतील तब्बल 74 जागा भाजप लढवणार!

Narendra Modi Latest News : भाजपच्या पहिल्या यादीत 300 जागांवर उमेदवार जाहीर होणार?

Chetan Zadpe

Delhi News : आगामी लोकसभेसाठी 'मिशन 400+' साध्य करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने प्रत्येक आघाडीवर 'फ्रंटफूटवर' राहण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहे. भाजपने लोकसभेसाठी उमेदवार निवडण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे. उमेदवारांबाबत केंद्रीय निवडणूक समितीची बैठक भाजप मुख्यालयात नुकतीच झाली. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. (Latest Marathi News)

प्राप्त माहितीनुसार, पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा वाराणसीतून निवडणूक लढवणार हे निश्चित झाले आहे. उत्तर प्रदेशात भाजप 74 जागांवर निवडणूक लढवणार आहे तर मित्रपक्षांना 6 जागा मिळतील अशी शक्यता आहे. भाजप आरएलडीसाठी लोकसभेच्या 2 जागा, अपना दलासाठी 2 लोकसभेच्या जागा आणि इतर मित्रपक्षांसांठी 2 जागा सोडणार आहे. गुरुवारी रात्री भाजपने वाराणसीसह लोकसभेच्या सुमारे 50 जागांसाठी उमेदवार निश्चित केल्याची माहिती आहे. (Lok Sabha Election 2024)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पंजाब, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूचा निर्णय स्थगित -

पंजाब, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये उमेदवारांचा निर्णय भाजपकडून लांबणीवर टाकण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या तीन राज्यांमध्ये प्रादेशिक आणि स्थानिक पक्षांशी युती करण्यासाठी भाजपची चर्चा सुरू आहे. भाजप पंजाबमध्ये अकाली दल, आंध्र प्रदेशमध्ये टीडीपी या पक्षांशी राजकीय समीकरणाबाबत उत्सुक आहे. तर तामिळनाडूमध्ये अण्णाद्रमुकशी भाडपची चर्चा सुरू आहे. (Latest Political News)

300 जागांसाठीचे उमेदवार 10 मार्चपूर्वी जाहीर होऊ शकतात -

भाजप 10 मार्चपूर्वी लोकसभेच्या 300 जागांसाठी उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे. भाजप उमेदवारांची पहिली यादी पुढील एक दोन दिवसात जाहीर करु शकते. मागील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भाजपची हीच योजना होती. निवडणूक जाहीर होण्याच्या काही आठवडे आधी म्हणजे 21 मार्च रोजी भाजपने 164 उमेदवारांची घोषणा केली होती.

400 + जागांचे लक्ष्य -

लोकसभेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानंतर आभार प्रस्तावाला उत्तर देताना पंतप्रधान मोदींनी (Narendra Modi) निवडणुकातील आपले लक्ष्याबाबत भाष्य केले होते. पीएम मोदी म्हणाले होते, "देशाचे राजकीय वातावरण सांगत आहे की, यावेळी भाजप 400 जागांचा आकडा पार करेल. भाजप एकटाच 370 जागा जिंकेल. NDA सोबत मिळून हा आकडा 400 पार करेल."

दक्षिण भारताच्या राज्यांमध्ये भाजपची कामगिरी -

दक्षिण भारतातील राज्यांमधील गेल्या निवडणुकीत भाजपची कामगिरी दमदार होती. भाजपने कर्नाटकातील (Karnataka) 28 पैकी 25 आणि तेलंगणातील 17 पैकी 4 जागा जिंकल्या होत्या. मात्र आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळमध्ये भाजपचे खातेही उघडले नाही. आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू आणि केरळमध्ये लोकसभेच्या 101 जागा आहेत. या जागांवर लक्ष केंद्रित करण्याचे भाजपची योजना आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT