lok sabha election 2024 phase 6: Sarkarnama
देश

Lok Sabha Election 2024 : सहाव्या टप्प्यात संबित पात्रा, मेहबुबा मुफ्ती अन् मनोज तिवारी यांच्यासह 'या' दिग्गज नेत्यांची लागणार कसोटी

lok sabha election 2024 phase 6: हाव्या टप्प्यात होत असलेल्या निवडणुकीसाठी दिल्लीसह देशातील अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या निवडणुकीत अनेक मात्तबर मंडळींची कसोटी लागणार आहे हे मात्र निश्चित आहे.

Rashmi Mane

lok sabha election 2024 phase 6 : सहाव्या टप्प्यातील लोकसभेच्या 58 जागांसाठी आज मतदान होत आहे. सहाव्या टप्प्यात होत असलेल्या निवडणुकीसाठी दिल्लीसह देशातील अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या निवडणुकीत अनेक मात्तबर मंडळींची कसोटी लागणार आहे हे मात्र निश्चित आहे.

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात यूपीसह सहा राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण 58 जागांसाठी मतदान होत आहे. या टप्प्यात उत्तर प्रदेशातील 14, हरियाणातील 10, बिहारमधील 8, झारखंडमधील 4, ओडिशातील 6, पश्चिम बंगालमधील 8, दिल्लीत 7 आणि जम्मू-काश्मीरमधील 1 जागांसाठी एकूण 889 उमेदवार रिंगणात आहेत.

लोकसभा निवडणुकीत या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला:

सहाव्या टप्प्यात संबित पात्रा, मेहबुबा मुफ्ती अन् मनोज तिवारी मनोहर लाल यांची चांगलीच कसोटी लागणार आहे. यातच केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान ओडिशातील संबलपूरमधून निवडणूक लढवत आहेत. तसेच केंद्रीय मंत्री मनेका गांधी पुन्हा भाजपच्या (BJP) तिकिटावर सुलतानपूरमधून निवडणूक लढवत आहेत. तर माजी मंत्री रामभुआल निषाद सपाकडून आणि बसपकडून उदराज वर्मा विद्यमान खासदारा विरोधात रिंगणात आहेत. तसेच दिल्लीत भाजपने मनोज तिवारी यांना संधी दिली आहे. त्यांचा सामना विरोधी आघाडीचे काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार यांच्याशी आहे. हरियाणाचे (Hariyana) माजी मुख्यमंत्री मनोहर लाल हेही या निवडणुकीत नशीब आजमावत आहेत. भाजपने त्यांना हरियाणाच्या कर्नाल मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पी.डी.पी. प्रमुख मेहबूबा मुफ्ती अनंतनाग-राजौरी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांची लढत नॅशनल कॉन्फरन्सचे उमेदवार धार्मिक नेते मियाँ अल्ताफ यांच्याशी आहे. तसेच ओडिशात पुरी मतदारसंघातून भाजपने आपले राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात बी.जे.डीचे अरुप पटनायक उभे आहेत. पात्रा यांनी मागच्या वेळीही येथून निवडणूक लढवली होती, मात्र त्यांचा पराभव झाला होता.

लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha Election) काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेले नवीन जिंदाल यांना कुरुक्षेत्रमधून उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या वेळी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवलेल्या जिंदाल यांना भाजपच्या उमेदवाराकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यांच्यासमोर आम आदमी पक्षाचे सुशील गुप्ता, आयएनएलडीचे अभय चौटाला आणि जे.जे.पीचे पाला राम सैनी आहेत. lok sabha election 2024 phase 6 sixth phase voting 58 seats Sambit Patra Mehbooba Mufti and Manoj Tiwari kanhaiya kumar reputation veterans is at stake

दिल्लीतील सातही मतदारसंघात आज मतदान होत आहे. त्यात या उमेदवारांनी संधी देण्यात आली आहे.

भाजपने बांसुरी स्वराज यांना नवी दिल्लीतून उमेदवारी दिली आहे. बांसुरी या माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज (Sushma Swaraj) यांच्या कन्या आहेत. पश्चिम बंगालमधील मेदिनीपूर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार अग्निमित्रा पॉल तृणमूलच्या जून मालिया यांच्याकडून निवडणूक लढवत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT