Akhilesh Yadav Sarkarnama
देश

LokSabha Election 2024 : अखिलेश यांनी वाढवलं काँग्रेसचं टेन्शन; पत्नीसह 16 उमेदवारांची नावं जाहीर

India Alliance : इंडिया आघाडीचे उत्तर प्रदेशातील जागावाटपाचे सूत्र ठरेना...

Rajanand More

Uttar Pradesh News : लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीमध्ये जागावाटपाच्या चर्चा सुरू असताना उत्तर प्रदेशातून मोठी बातमी आली आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेससोबत जागावाटपाचा सस्पेन्स कायम असताना अखिलेश यांनी ही यादी जाहीर केल्याने काँग्रेसचे टेन्शन वाढले आहे. (LokSabha Election 2024)

समाजवादी पक्षाने (Samajwadi Party) 16 उमेदवारांची पहिली यादी घोषित केली आहे. त्यामध्ये अखिलेश (Akhilesh Yadav) यांच्या पत्नी डिंपल यादव यांच्या नावाचाही समावेश आहे, तसेच धर्मेंद्र यादव आणि अक्षय यादव या बड्या नेत्यांनाही पहिल्या यादीत स्थान देण्यात आले आहे.

अखिलेश यांनी उत्तर प्रदेशात काँग्रेसला (Congress) 11 जागांची ऑफर दिली आहे. काही दिवसांपूर्वीच सपा आणि रालोदमध्ये आघाडी झाली असून रालोदसाठी सात जागा सोडण्यात आल्याचे अखिलेश यांनी सांगितले होते. या जागावाटपावरून काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आघाडीचा सस्पेन्स वाढला होता. त्यात आता 16 उमेदवारांची यादी जाहीर केल्याने दोन्ही पक्षांतील तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उत्तर प्रदेश हे सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्त्वाचे राज्य आहे. या राज्यात लोकसभेच्या सर्वाधिक 80 जागा आहेत. त्यामुळे भाजपसह काँग्रेस, सपा, बसपा आदी पक्षांकडून विशेष काळजी घेतली जात आहे. राज्यात भाजपला मागील दोन्ही निवडणुकीत मोठे यश मिळालं होतं. त्यांना रोखण्यासाठी सपा आणि काँग्रेसने आघाडी केली आहे. पण अजूनही जागावाटपावर शिक्कामोर्तब झालेले नाही.

सपाच्या उमेदवारांची पहिली यादी –

1. संभल - शाफिकुर रहमान बर्क

2. फिरोजाबाद - अक्षय यादव

3. मैनपुरी - डिंपल यादव

4. एटा - देवेश शाक्य

5. बदायू - धर्मेंद्र यादव

6. खीरी - उत्कर्ष वर्मा

7. धौरहरा - आनंद भदौरिया

8. उन्नाव - अनू टंडन

9. लखनऊ - रविदास मेहरोत्रा

10. फर्रुखाबाद - नवल किशोर शाक्य

11. अकबरपूर - राजारामपाल

12. बांदा - शिव शंकर सिंह

13. फैजाबाद - अवधेश प्रसाद

14. आंबेडकरनगर - लालजी वर्मा

15. बस्ती - राम प्रसाद चौधरी

16. गोरखपूर - काजल निषाद

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT