Chandigarh News : लोकसभा निवडणुकीआधी इंडिया आघाडीची पहिली परीक्षा मानली जात असलेल्या चंदीगड महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. बहुमत असूनही आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाल्याने मोठा धक्का बसला आहे. भाजपचे नेते विनोद तावडे यांची खेळी बिहारप्रमाणेच या निवडणुकीतही यशस्वी ठरल्याचे मानले जात आहे. (BJP Vs India Alliance)
चंदीगड महापौरपदी (Chandigarh Mayor Election) भाजपचे (BJP) मनोज सोनकर विराजमान झाले आहेत. त्यांनी आम आदमी पक्षाचे (AAP) उमेदवार कुलदीप कुमार यांचा पराभव केला. या निवडणुकीत काँग्रेसने (Congress) आपशी आघाडी केली होती. ही भाजप आणि इंडिया आघाडीतील (India Alliance) पहिलीच थेट निवडणूक होती. त्यामुळे दोन्ही बाजूने निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली होती.
चंदीगडमध्ये आपचे 13 तर काँग्रेसचे सात सदस्य होते. त्यामुळे त्यांचा उमेदवार सहजपणे निवडून येईल, याची खात्री दोन्ही पक्षांना होती. तर भाजपकडे केवळ १४ सदस्य होते. आघाडीमध्ये महापौरपद आपकडे आणि काँग्रेसने दोन उपमहापौरपदे आपल्याकडे ठेवली. महापौरपदाच्या निवडणुकीत आपच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भाजपच्या उमेदवाराला 16 मते पडली. तर 20 सदस्य असूनही आपच्या उमेदवाराला केवळ 12 मतांवर समाधान मानावे लागले. आघाडीच्या आठ सदस्यांची मते अवैध ठरवण्यात आल्याने भाजपच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला.
विनोद तावडे हे हरयाणाच्या प्रभारी होते. दोन दिवसांपुर्वीच त्यांच्यावर बिहारची जबाबदारी सोपवण्यात आली. त्याआधी त्यांनी बिहारमध्येही सत्तापालट घडवून आणण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. आता चंदीगडमध्येही बहुमत नसताना त्यांची खेळी यशस्वी ठरल्याचे मानले जात आहे. आघाडीची आठ मते अवैध ठरण्यामागे राजकीय रणनीती असल्याची चर्चा आहे. दरम्यान, आठ मते अवैध ठरवल्यानंतर आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर गैरप्रकाराचे आरोप केले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.