Rahul Gandhi, Lalu Prasad Yadav Sarkarnama
देश

Supreme Court News : …निवडणूक लढण्यापासून रोखू शकत नाही; कोर्टानं का घेतलं लालू अन् राहुल गांधींचं नाव?

Lok Sabha Election 2024 : निवडणुकांमध्ये अनेक मतदारसंघात सारख्या नावाचे उमेदवार असतात. काहीवेळा त्याचा फटका प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना बसतो. विरोधकांकडून अशा राजकीय खेळ्या खेळल्या जातात.

Rajanand More

New Delhi News : लोकसभा निवडणुकीसह अनेक निवडणुकांमध्ये एकसारख्या नावाचे उमेदवार रिंगणात असतात. खरेतर विरोधी उमेदवाराची मतं खाण्यासाठीच असे सारख्या नावाचे उमेदवार देण्याचे डावपेच आखले जातात. यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही अहमदनगरसह काही मतदारसंघात असे उमेदवार मैदानात आहेत. अशा उमेदवारांना निवडणूक लढण्याबाबत बंधने आणण्यासाठी थेट सुप्रीम कोर्टात (Supreme Court News) याचिका दाखल करण्यात आली होती.

साबू स्टीफन यांनी वकील व्ही. के. बिजू यांच्यामार्फत सुप्रीम कोर्टात (Supreme Court) याचिका दाखल केली होती. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. प्रमुख पक्षाच्या किंवा एखाद्या मोठ्या राजकीय नेत्यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या उमेदवाराला त्याच मतदारसंघातून निवडणूक (Lok Sabha Election 2024) लढण्यापासून रोखावे, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती.

कोर्टाने या याचिकेवर सुनावणी करताना म्हटले की, एखाद्याच्या आई-वडिलांनी त्याचे नाव राहुल गांधी (Rahul Gandhi) किंवा लालू प्रसाद यादव ठेवले असेल तर त्याआधारावर संबंधिताला निवडणूक लढण्यापासून रोखले जाऊ शकत नाही, असे कोर्टाने स्पष्ट केले. न्यायाधीश बी. आर. गवई (B. R. Gawai), सतीश चंद्र शर्मा आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याचिकाकर्त्यांच्या वकीलांनी आपली बाजू मांडताना म्हटले होते की, निवडणूक आयोगाचे दोन अहवाल पाहिल्यानंतर या मुद्द्याचे परीक्षण केले आहे. निवडणूक नियम 1961 मधील नियम 22 (3) नुसार, दोन किंवा त्यापेक्षा अधिक उमेदवारांचे सारखे नाव असेल तर त्यांना त्यांचा व्यवसाय किंवा निवास्थान किंवा अन्य पर्याय जोडून ओळखले जाईल.

या याचिकेवर सुनावणी करण्यासाठी कोर्ट उत्सूक नसल्याचे लक्षात आल्यानंतर वकिलांनी याचिका मागे घेण्याची विनंती केली. याचिका मागे घेतल्याचे मानून कोर्टाने याचिका फेटाळून लावली. दरम्यन, अहमदनगरमध्ये निलेश लंके नावाचे दोन उमेदवार रिंगणात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके आणि एक अपक्ष निलेश लंके निवडणूक लढवत आहेत.     

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT