PM Narendra Modi News : राहुल गांधींना रायबरेलीतून उमेदवारी मिळताच मोदींनी दिलं आव्हान...

Rahul Gandhi News : काँग्रेसकडून राहुल गांधींना रायबरेलीतून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मागील निवडणुकीत त्यांचा अमेठीमध्ये पराभव झाल्यानंतर यावेळी कोणत्या मतदारसंघातून उमेदवार मिळणार, याबाबत उत्सुकता होती.
Rahul Gandhi, PM Narendra Modi
Rahul Gandhi, PM Narendra ModiSarkarnama

Lok Sabha Election 2024 : उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी लोकसभा मतदारसंघातून कुणाला उमेदवारी मिळणार, याबाबत मागील अनेक दिवस उत्सुकता होती. अखेर आज काँग्रेसने रायबरेलीतून राहुल गांधी आणि अमेठीतून के. एल. शर्मा यांना उमेदवारी जाहीर करत त्यावर पडदा टाकला. मात्र, राहुल यांना रायबरेलीतून उमेदवारी देण्यात आल्याने भाजपमधील अनेक नेत्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही (PM Narendra Modi News) निशाणा साधला आहे. त्यांनी आज राहुल यांना खोचक टोला लगावत आव्हानही दिले.

पंतप्रधान मोदींनी आज सकाळी एका प्रचारसभेत बोलताना राहुल यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, राहुल गांधींचा वायनाडमध्ये पराभव होणार आहे. त्यामुळे ते नवीन मतदारसंघ शोधत आहेत, असे मी आधीच म्हणलो होते. त्यांचे कार्यकर्ते म्हणत होते की, राहुल अमेठीतूनच (Amethi) लढतील. पण ते इतके घारबले की, वायनाडमधून पळून रायबरेली पोहचले.

Rahul Gandhi, PM Narendra Modi
Congress News: अखेर ठरलं; राहुल गांधी रायबरेलीमधून निवडणूक लढणार, अमेठीतून केएल शर्मा मैदानात

‘डरो मत...डरो मत... असे देशभर फिरून ते बोलत असतात. आज मीही म्हणू इच्छितो, डरो मत...भागो मत’, असा टोला मोदींनी लगावला. काँग्रेसला आधीपेक्षा कमी जागा मिळणार आहेत. यावेळी निवडणूकच कमी जागांवर लढत आहेत. हे निवडणूक जिंकण्यासाठी देशाचे तुकडे करण्यासाठी निवडणुकीचा वापर करत आहेत. ही आघाडी केवळ एका व्होट बँकेसाठी समर्पित आहे, अशी टीकाही मोदींनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निवडणुकीचा निकाल स्पष्ट आहे. कोणत्याही पोलची गरज नाही. मी आधीच म्हणालो होतो, त्यांचा एक मोठा नेता निवडणुकीचा सामना करणार नाही, पळून जातील. राजस्थानमधून राज्यसभेत मागच्या दरवाजाने त्या संसदेत पोहचल्या. वायनाडमध्येही शहजादे निवडणूक हरणार आहेत, त्यामुळे दुसरा मतदारसंघ शोधतील. आता ते अमेठीतून लढण्यास घाबरत आहेत आणि रायबरेलीला पळून गेले, अशी टीका मोदींनी केली.  (Latest Political News)

दरम्यान, प्रियंका गांधी या अमेठीतून लोकसभा लढविणार असल्याची चर्चा होती. या जागेवर आता किशोरीलाल शर्मा यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर रायबरेलीत भाजपचे उमेदवार दिनेश प्रताप सिंह यांच्याशी राहुल गांधी यांचा सामना होणार आहे.

दिनेश प्रताप सिंह यांचा 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सोनिया गांधींकडून पराभव झाला होता. भाजपने पुन्हा त्यांनाच उमेदवारी देत विश्वास दाखवला आहे. तर स्मृती इराणींना यांना अमेठी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. मागील निवडणुकीत त्यांनी राहुल यांचा पराभव केला होता.

Rahul Gandhi, PM Narendra Modi
Nashik Constituency 2024 : मुख्यमंत्री शिंदे ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत, 'हा' मोठा नेता सोडणार पक्ष

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com