Amit Shah Sarkarnama
देश

Lok Sabha Election 2024 : अमित शाहांनी सांगितले 400 पारचे गणित; दक्षिण भारताबाबत मोठा दावा...

Rajanand More

New Delhi News : लोकसभा निवडणुकीतील (Lok Sabha Election 2024) चौथ्या टप्प्यातील मतदान सोमवारी देशभरात होत आहे. एकूण 96 जागांसाठी हे मतदान होत असून आंध प्रदेश आणि ओडिशामध्ये विधानसभा निवडणुकीसाठीही मतदान सुरू आहे.

निवडणूक चौथ्या टप्प्यात आल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दक्षिण भारताबाबत मोठा दावा केला आहे. दक्षिण भारतात बहुतेक राज्यांमध्ये भाजपचे क्रमांक एकचा पक्ष असेल, असे शाह यांनी म्हटले आहे.

अमित शाह (Amit Shah) यांनी ‘एनडीटीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत हा दावा केला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने 400 पारचा नारा दिला आहे. हा टप्पा कसा गाठणार या प्रश्नावर उत्तर देताना शाह म्हणाले, एनडीए 400 हून अधिक जागा मिळवत मजबूत बहुमताने सरकार बनवेल. नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील. (Latest Political News)

दक्षिण भारतातील कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि केरळ या पाचही राज्यांमध्ये भाजपला (BJP) इतर पक्षांच्या तुलनेत जास्त जागा मिळतील. या राज्यांमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येईल, असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एनडीएला 400 हून जागा मिळाल्यास संविधान बदलले जाईल, अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे. त्यावर शाहांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष होते, तेव्हापासून ते खोटं बोलत आहेत. मोदीजी दोनदा पंतप्रधान बनले. दोन्ही वेळेस दोन तृतियांश बहुमत होते. भाजपला जर संविधान बदलायचेच असते तर कुणी अडवलं असतं?, असा उलट सवाल शाहांनी केले.

राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला आहे. देशातील महत्वाच्या संस्थांमध्ये दलित, ओबीसी, मागासवर्गातील विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण होत नाहीत, कारण उच्चवर्णीयांकडून पेपर सेट केले जातील, असे राहुल या व्हिडिओमध्ये म्हणतात. त्यावरही शाह यांनी निशाणा साधला.

आपल्या देशात अनेक दलित मुले आयएएस, आयपीएस बनले. राज्यांच्या सेवेत आहेत. डॉक्टर, इंजिनिअर बनले आहेत. देशातील प्रत्येक व्यक्तीला संधी देण्याची व्यवस्था संविधानात आहे. राहुल यांचाच पेपर नीट सेट झालेला नाही, अशी टोला शाहांनी लगावला.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT