Vladimir Putin, Joe Biden, Narendra Modi Sarkarnama
देश

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत अमेरिकेची ढवळाढवळ; रशियाच्या दाव्यामुळं खळबळ

Rajanand More

New Delhi News : भारतामध्ये लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election 2024) तीन टप्पे पूर्ण झाले असून पुढील चार टप्प्यांसाठीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच रशियाने अमेरिकेबाबत मोठा दावा केला आहे. भारतातील लोकसभा निवडणुकीत अमेरिकेकडून ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा रशियाने केला आहे. निवडणुकीदरम्यान भारतात अस्थिरता निर्माण करण्याचा उद्देश असल्याचे रशियाने म्हटले आहे.

रशियाच्या (Russia) सरकारी न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया जाखारोवा यांनी हा दावा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘अमेरिका (US) भारतातील राजकीय वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न करत आहे. भारताचा इतिहास आणि राजकीय स्थितीची अमेरिकेला समझ नाही.’ भारतातील (India) धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या एका अहवालाबाबत जाखारोवा यांनी आपले मत मांडले आहे. (Latest Political News)

अमेरिका सातत्याने भारतातील धार्मिक स्वातंत्र्याबाबत निराधार आरोप करत आहे. भारतातील अंतर्गत राजकीय वातावरण बाधित करणे आणि निवडणुकीदरम्यान अस्थिरता निर्माण करण्याच्या उद्देशाने हे केले जात असल्याचा दावा जाखारोवा यांनी केला आहे. भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये दखल देण्याची अमेरिकेची ही कृती अपमानजनक असल्याचेही त्या म्हणाल्या आहेत. (Marathi News Update)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नूच्या हत्येच्या षडयंत्राबाबतही मारिया यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. षडयंत्राबाबत भारतावर आरोप केले जात आहेत. त्याविषया मारिया म्हणाल्या, भारतीय नागरिकांच्या सहभागाबाबत अमेरिकेने कसलेही पुरावे दिलेले नाहीत. पुराव्यांअभावी अशी मतं मांडणे अस्वीकार्य आहे.

अमेरिका सातत्याने भारतावर खोटे आरोप करत आहे. भारताच्या इतिहासाची समझ त्यांना नाही. त्यामुळेच धार्मिक स्वातंत्र्याचा मुद्दा पुढे करून निराधार आरोप केले जात असल्याचे मारिया यांनी स्पष्ट केले. आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकी आयोग USCIRF च्या ताज्या अहवालामध्ये कथितपणे धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन केल्याबाबतत भारतावर टीका करण्यात आली आहे. दरम्यान, भारत सरकारने हा अहवाल फेटाळून लावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT