S Jaishankar On POK : 'पीओके' मिळवून दाखवणारच, '370' बाबतही लोकांना विश्वास नव्हता, पण...; जयशंकर यांना विश्वास!

Lok Sabha Election 2024 : "पीओके आपला भाग आहे. तो कधीही भारताबाहेर जाणार नाही."
S Jaishankar On POK
S Jaishankar On POKSarkarnama

Delhi News : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पाकव्याप्त काश्मीर (पीओके) बाबत आपल्या सरकारचा इरादा स्पष्ट केला आहे. पीओके भूभाग भारतात पुन्हा समाविष्ट करण्यासाठी नरेंद्र मोदी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. परराष्ट्र मंत्री दिल्ली विद्यापीठाच्या गार्गी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. यावेळी ते म्हणाले, "लोकांचा काश्मीरबाबतचा 370 चा निर्णयाबाबत अनेकांना विश्वास नव्हता, पण मोदी सरकारने ते करुन दाखवलं. अशाच पद्धतीने पीओके बाबतही निर्णय घेतला जाईल." (Latest Marathi News)

जयशंकर म्हणाले, "लोकांना 370 कलम हटवलं जाईल, याबाबत विश्वास नव्हता. मात्र आपण काश्मीरमधील परिस्थिती बदलली. पीओकेच्या संदर्भात मी एवढेच सांगू शकतो की संसदेत (Sansad) एक ठराव आहे आणि भारताचा भाग असलेला पीओके भारतात परत यावे यासाठी देशातील प्रत्येक राजकीय पक्ष वचनबद्ध आहे, जेव्हा आम्ही कलम 370 रद्द केले, तेव्हा आता लोकांना समजले आहे की पीओके देखील महत्त्वाचे आहे."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याआधी रविवारी परराष्ट्रमंत्र्यांनी जाहीर केले होते की, "पीओके आपला भाग आहे. तो कधीही भारताबाहेर (India) जाणार नाही. पीओके पूर्णपणे भारताचा भाग असल्याचा संसदेचा ठराव आहे. भारत आता भूतकाळाच्या जोखडातून बाहेर पडत आहे. जगाचे लक्ष्य भारताने वेधले आहे. जगामध्ये भारताची तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल सुरु आहे."

S Jaishankar On POK
Ajit Pawar NCP : बारामतीत 'घड्याळा'च्या प्रचारासाठी आणलं अन् उन्हातान्हात उपाशी ठेवलं
S Jaishankar On POK
Shivsena Vs BJP: प्रसाद लाड यांनी ठाकरेंना डिवचलं; म्हणाले, उद्धव यांची गत 'उंदीर गेला लुटी...'

"सध्या आपण चार ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेपेक्षा थोडेसे कमी आहोत. लवकरच आपण पाच ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचणारी तिसरी सर्वात मोठी जागतिक अर्थव्यवस्था बनू. जोपर्यंत आपण अमृत कालापर्यंत पोहोचतो तोपर्यंत भारत 30 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होईल, असा मला विश्वास आहे, असेही जयशंकर म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com