Ajay Rai, Narendra Modi Sarkarnama
देश

Lok Sabha Election 2024 : मोदींना भिडणार काँग्रेसचा ‘बाहुबली’; निकाल काही लागो, इतिहास घडणार...

Ajay Rai Against PM Narendra Modi : मोदींविरोधात दोनदा पराभूत होऊनही काँग्रेसने राय यांच्यावरच विश्वास दाखवला आहे. सध्या ते उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आहेत.

Rajanand More

Uttar Pradesh News : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) काँग्रेसकडून काल 46 उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. या यादीतील सर्वात महत्वाचे नाव म्हणजे अजय राय. उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष असलेले अजय राय यांना वाराणसी लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. या मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग दोनदा विक्रमी मतांनी विजयी झाले आहे. विशेष म्हणजे दोन्ही वेळी अजय राय हेच त्यांचे प्रतिस्पर्धी होती.

काँग्रेसने (Congress) अजय राय यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. राय यांना त्यांच्या भागात बाहुबली म्हणून ओळखले जाते. आरएसएसच्या मुशीत वाढलेले एबीव्हीपी, भाजप (BJP), समाजवादी पार्टी असा प्रवास करून काँग्रेसमध्ये आलेले अजय राय सध्या उत्तर प्रदेश काँग्रेसचा मोठा चेहरा आहेत. या निवडणुकीत (Latest Election News) सपा आणि काँग्रेस आघाडी असून वाराणसी मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आला आहे.

...तर होईल पराभवाची हॅटट्रिक

पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) विरूध्द अजय राय अशी लढत तिसऱ्यांदा होणार आहे. 2014 च्या निवडणुकीत राय (Ajay Rai) यांना केवळ 75 हजार 614 मतं मिळाली होती. त्यांचा तब्बल पाच लाखांहून अधिक मतांनी पराभव झाला होता. त्यावेळी अरविंद केजरीवालही रिंगणात असल्याने तिहेरी लढत झाली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

2019 मध्ये राय यांना दीड लाखांहून अधिक मतं मिळाली पण जवळपास सव्वा पाच लाखांहून अधिक मतांनी पराभूत झाले. आता पुन्हा ते मैदानात उतरले आहेत. यावेळीही त्यांना यश न मिळाल्यास त्यांच्या पराभवाची हॅटट्रिक होणार आहे. हा पंतप्रधानांविरुध्दच्या लढतीचा एकप्रकारे विक्रमच ठरणार आहे. मोदींविरुध्द राय यांना विजय मिळण्याची शक्यता अजिबातच नाही. पण तसे झाल्यास हा विजय ऐतिहासिक ठरले.

दरम्यान, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राय यांनी हर हर महादेवचा नारा दिला. त्यांनी एक्स हँडलवरून हायकमांडचे आभार मानले. तसेच लढणार आणि लढून जिंकणार, हर हर महादेव, असा विश्वास राय यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT