Lok Sabha Election 2024 : माजी हवाई दल प्रमुख भदौरिया भाजपमध्ये; लोकसभेचं तिकीट मिळणार?

RKS Bhadauria News : भदौरिया हे जवळपास चाळीस वर्षे हवाई दलात होते. आज भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी पंतप्रधान मोदी हे विकसित भारताचा संकल्प पूर्ण करतील, असा विश्वास व्यक्त केला.
RKS Bhadauria
RKS Bhadauria Sarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election 2024) कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांमध्ये अन्य पक्षांतील आजी-माजी आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांना प्रवेश दिला जात आहे. त्यामध्ये भाजपने आघाडी घेतली आहे. त्यातच हवाई दलाचे माजी प्रमुख एअर चीफ मार्शल (निवृत्त) राकेश कुमार सिंह भदौरिया हेही आज भाजपमध्ये दाखल झाले. पक्षप्रवेशानंतर भदौरिया यांनी मोदी सरकारचे तोंडभरून कौतुक केले.

भाजपचे (BJP) सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थित भदौरिया यांनी पक्षात प्रवेश केला. यावेळी आंध्र प्रदेशातील वायएसआर काँग्रेसचे नेते व्ही. प्रसाद राव यांचाही आज भाजपमध्ये प्रवेश झाला. भदौरिया हे जवळपास चार दशकांपासून हवाई दलामध्ये होते. ते सप्टेंबर 2021 मध्ये हवाई दल प्रमुख पदावरून निवृत्त झाले.

RKS Bhadauria
Arvind Kejriwal News: जेलमधून सरकार चालवण्यास केजरीवालांकडून सुरवात; पहिला आदेश...

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भदौरिया म्हणाले, मी हवाई दलामध्ये मागील चाळीस वर्षे काम केले. (Latest Political News) पण माझ्या सेवेतील सर्वात चांगला काळ हा आठ वर्षांचा होता. लष्कराला अधिक बळकट करण्यासाठी मोदी सरकारने (Modi Government) खूप महत्वाची पावले टाकली. लष्कराला आधनिक बनविण्याबरोबरच आत्मनिर्भरतेसाठी आत्मविश्वास निर्माण केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सरकारच्या प्रयत्नांचे चांगले परिणाम सध्या प्रत्यक्ष दिसून येत आहे. सुरक्षेच्यादृष्टीने विचार केला तर सरकारने महत्वाचे निर्णय घेतले. त्यामुळे जगभरात भारत वेगळ्या उंचीवर पोहचेल, असा विश्वासही भदौरिया यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, भदौरिया हे 30 सप्टेंबर 2019 ते 30 सप्टेंबर 2021 पर्यंत हवाई दलाचे (IAF) प्रमुख होते. उपप्रमुख असताना त्यांनी राफेल विमान खरेदीतील वाटाघाटीमध्ये महत्वाची भूमिका पार पाडली होती. ते भारतीय हवाई दलाचे 26 वे प्रमुख होते.  

भदौरिया हे उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh Politics) आग्रा जिल्ह्यातील ते रहिवासी आहेत. त्यामुळे त्यांना गाझियाबाद लोकसभा मतदारसंघातून लोकसभेचे तिकीट मिळू शकते, अशी चर्चा आहे. यापूर्वी व्ही. के. सिंह या मतदारसंघाचे खासदार होते. त्यांनी दोनदा या मतदारसंघातून निवडणूक लढली होती.   

RKS Bhadauria
Arvind Kejriwal Case Update : न्यायालयाचा पुन्हा दणका; केजरीवालांच्या अडचणी संपेना...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com