Lok Sabha Election News : लोकसभा निवडणुकीची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी शनिवारी दुपारी केली आहे. देशभरात एकूण सात टप्प्यांत मतदान होणार आहे. त्यापैकी पाच टप्प्यांत महाराष्ट्रात मतदान होणार आहे. हिमालयापासून समुद्रापर्यंत आणि वाळवंटापासून पावसाळी ईशान्येपर्यंत बूथवर समान सुविधा असणार आहेत.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, राज्यांमध्ये तैनात स्वयंसेवक आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचा निवडणुकीदरम्यान वापर केला जाणार नाही. या मतदानावेळी निवडणूक आयोगाने विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. विशेषतः केंद्रीय आयोगाचे २१०० निरीक्षक कार्यरत असणार आहेत.
देशभरातील दिव्यांग मतदारांना घरबसल्या मतदान करता येणार आहे. 85 वर्षांवरील सर्व मतदारांच्या किंवा अपंग मतदारांच्या घरी फॉर्म पाठवले जातील, जेणेकरून त्यांना घरबसल्या मतदान करता येईल. ते बूथवर आल्यावर आयोगाचे स्वयंसेवक त्यांना मदत करतील, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
प्रत्येक बूथवर मतदारांसाठी आवश्यक सुविधा असतील. जिथे पिण्याचे पाणी, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, रॅम्प, व्हीलचेअर आदी सुविधा उपलब्ध असतील, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली.
R