Mamata Banerjee, Swapan Banerjee Sarkarnama
देश

Mamata Banerjee News : एका उमेदवारामुळे ममतांनी भावासोबतचं नातंच तोडलं; नेमकं काय घडलं?

Swapan Banerjee News : स्वपन बॅनर्जी यांनी हावडा येथील तृणमूलच्या उमेदवारावरून नाराजी व्यक्त केली आहे. तसेच ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चाही आहे.

Rajanand More

West Bengal News : लोकसभा निवडणुकीमुळे आता देशभरातील वातावरण तापलं आहे. बहुतेक पक्षांकडून उमेदवारांची घोषणा केली जात असून, त्यावरून अनेकांची नाराजीही समोर येत आहे. पश्चिम बंगालमध्ये तर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee News) आणि त्यांच्या भावामध्ये दुरावा निर्माण झाला आहे. एका उमेदवारावरून आज ममतांनी थेट भावाशी असलेले नातं तोडल्याचे जाहीर करून टाकले.

ममतांचे बंधू स्वपन बॅनर्जी (Swapan Banerjee) यांनी तृणमूल काँग्रेसचे हावडा मतदारसंघातील उमेदवार प्रसून बॅनर्जीवर आक्षेप घेतला आहे. त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत प्रसून यांच्यावर जाहीरपणे टीका केली आहे. तसेच ते भाजपमध्ये (BJP) जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. या मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती. या पार्श्वभूमीवर ममतांनी आज मोठं विधान करत खळबळ उडवून दिली आहे.

भावाशी असलेले नातं तोडताना ममता म्हणाल्या, लोकांचं वय जसं वाढत जातं, तशा त्यांच्या अपेक्षाही वाढत जातात. माझ्या कुटुंबात 32 लोकं आहेत. आता मी त्याला माझ्या कुटुंबाचा सदस्य मानत नाही. आजपासून कुणीही तो माझा भाऊ असल्याची ओळख करून देऊ नये.

भावासोबतचे संबंध मी तोडत आहे. मी घराणेशाहीचे राजकारण करत नाही. प्रसून बॅनर्जी (Prasoon Banerjee) हे अर्जुन पुरस्कार मिळालेले खेळाडू आहेत. ते पक्षाचे उमेदवार आहेत, असेही ममतांनी म्हटले आहे. हावडामधून तृणमूलने (TMC) दुसऱ्या चांगल्या व्यक्तीला उमेदवारी द्यायला हवी होती, असे स्वपन यांनी म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रसून बॅनर्जी यांच्या उमेदवारीबाबत नाराजी व्यक्त करत स्वपन बॅनर्जी म्हणाले, हावडा मतदारसंघासाठी देण्यात आलेल्या उमेदवाराविषयी मी नाराज आहे. प्रसून यांची निवड योग्य नाही. अनेक योग्य उमेदवारांना दुर्लक्षित करण्यात आल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

स्वपन यांनी भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. भाजपमध्ये जाणार असल्याच्या बातम्या चुकीच्या असून, आपण बहिणीलाच मदत करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, प्रसून बॅनर्जी हे हावडा मतदारसंघातून दोनदा निवडून आले आहेत. त्यांची उमेदवारी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT