Lok Sabha Election 2024 : भाजप उमेदवार पवन सिंह यांची पलटी; शत्रुघ्न सिन्हा यांच्याशी भिडणार

Pawan Singh News : पवन सिंह यांना आसनसोल मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती.
Shatrughna Sinha, Pawan Singh
Shatrughna Sinha, Pawan SinghSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) पश्चिम बंगालमधील आसनसोल मतदारसंघातील लढत आता रंगतदार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तृणमूल काँग्रेसने या मतदारसंघातून विद्यमान खासदार, अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांना उमेदवारी दिली आहे, तर भाजपने उमेदवारी जाहीर केलेल्या पवन सिंह यांनीही दहा दिवसांनंतर निवडणूक लढण्यासाठी सज्ज असल्याचे जाहीर केले आहे.

पवन सिंह (Pawan Singh) हे प्रसिद्ध भोजपुरी अभिनेते आहेत. त्यामुळे शत्रुघ्न सिन्हा (Shatrughna Sinha) यांच्याविरोधात भाजपने (BJP) त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पण दुसऱ्याच दिवशी यांनी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले होते. भाजपसाठी हा मोठा धक्का होता. भाजपचे तिकीट नाकारणारे पवन सिंह हे पहिले उमेदवार होते. त्यामुळे चर्चांना उधाण आले होते.

Shatrughna Sinha, Pawan Singh
Modi Government News : जो कहाँ, वो किया! मोदींनी ‘ही’ तीन मोठी आश्वासनं केली पूर्ण...

पवन सिंह यांनी माघार घेतल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू होते. त्यातच त्यांनी मागील आठवड्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (JP Nadda) यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी काहीही स्पष्ट भूमिका मांडली नव्हती. ते निवडणूक (Election) लढणार की नाही, याबाबत संभ्रम वाढला होता. अखेर आज त्यांनी एक्स हॅंडलवरून निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पवन सिंह यांनी म्हटले आहे की, ‘मी माझा समाज, जनता जनार्दन आणि आईला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी निवडणूक लढवणार आहे. तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आणि सहकार्य अपेक्षित आहे.’ पवन सिंह यांच्या यू टर्नमुळे भाजपलाही दिलासा मिळाला आहे.

कोण आहेत पवन सिंह?

पवन सिंह हे अभिनेते आणि गायक आहे. त्यांना दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत. मूळचे बिहारचे असले तरी त्यांना बंगालमधील मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. भोजपुरी चित्रपटांमधील सर्वात महागडे अभिनेते म्हणून त्यांची ओळख आहे.

R

Shatrughna Sinha, Pawan Singh
Electoral Bond News : मोठी बातमी ! ...अखेर SBI ने आयोगाला निवडणूक रोख्यांचा डेटा पाठवला; प्रसिद्ध कधी होणार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com