Manohar Lal Khattar News : खट्टर यांचा विधानसभेतच आमदारकीचा राजीनामा; नवे CM हबकले

Nayab Singh Saini Government Floor Test : नव्या सरकारची बहुमत चाचणी आज पार पडली. सरकारच्या बाजूने 49 आमदारांनी मतदान केल्याने विश्वासदर्शक ठराव जिंकला.
Manohar Lal Khattar, Nayab Singh Saini
Manohar Lal Khattar, Nayab Singh Saini Sarkarnama
Published on
Updated on

Haryana News : हरियाणात अजूनही राजकीय उलथापालथ सुरूच आहे. काल मनोहरलाल खट्टर (Manohar Lal Khattar News) यांनी मुख्यमंत्रीपदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर नायब सिंह सैनी यांनी काही तासांतच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर आज विधानसभेत नव्या मुख्यमंत्र्यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला. हा ठराव जिंकल्यानंतर मुख्यमंत्र्यांना माजी मुख्यमंत्र्यांनी पहिला धक्का दिला.

लोकसभा निवडणुकीतील (Lok Sabha Election 2024) जागावाटपावरून भाजप (BJP) आणि जेजेपीमधील आघाडी तुटल्याने खट्टर यांनी काल राजीनामा दिला. राज्यात जेजेपीसोबत आघाडी करत भाजपने सत्ता स्थापन केले होती. विधानसभेत भाजपचे 41 तर जेजेपीचे 10 आमदार आहेत. आघाडी तुटल्यानंतर भाजपने अपक्षांचा पाठिंबा मिळवत सरकार स्थापनेचा दावा केला.

Manohar Lal Khattar, Nayab Singh Saini
Lok Sabha Election 2024 : भाजप उमेदवार पवन सिंह यांची पलटी; शत्रुघ्न सिन्हा यांच्याशी भिडणार

काल सैनी यांनी शपथ घेतल्यानंतर आज लगेच विधानसभेत (Assembly) विश्वासदर्शक ठराव (Nayab Singh Saini Government Floor Test) सादर करण्यात आला. सरकारच्या बाजूने 49 आमदारांनी मतदान केले. बहुमतासाठी 46 आमदारांचा पाठिंबा आवश्यक होता. बहुमत चाचणी जिंकल्यानंतर माजी मुख्यमंत्री खट्टर यांनी नव्या मुख्यमंत्र्यांना धक्का दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खट्टर आणि सैनी विधानसभेत पहिल्या रांगेत शेजारी-शेजारी बसले होते. खट्टर बोलत असताना सैनी त्यांच्याकडे बघून स्मितहास्य करत होते. पण अचानक त्यांच्या चेहऱ्यावरील रंग उडाल्याचे पाहायला मिळाले. कारणही तसेच होते. खट्टर यांनी आजच आमदारकीचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली आणि मुख्यमंत्री हबकले. त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव स्पष्टपणे कॅमेरामध्ये टिपले गेले आहेत. आता नवीन मुख्यमंत्री आपल्या मतदारसंघाची काळजी घेतील, असे सूचक विधानही खट्टर यांनी केले आहे.

खट्टर हे करनाल मतदारसंघाचे आमदार होते. आता त्यांनी राजीनामा दिल्याने त्याजागी सैनी हे पोटनिवडणूक लढवतील. सैनी हे ध्या कुरुक्षेत्र लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. ते खासदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीत आपले नशीब आजमावतील.

Manohar Lal Khattar, Nayab Singh Saini
Lok Sabha Election 2024 : ओवेसी लढवणार बिहारच्या 11 जागा; इंडिया आघाडीच्या मतांना सुरुंग लावणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com