New Delhi News : देशभरात लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha 2024) पहिल्या टप्प्यातील मतदानाचा उत्साह शिगेला पोहाेचलेला असताना नागालँड या राज्यातील अनेक मतदान केंद्रे ओस पडल्याचे चित्र आहे. या राज्यातील जवळपास सहा जिल्ह्यांमध्ये एकाही मतदानाने मतदानाचा हक्क बजावलेला नाही. मतदानाची वेळ संपण्यास आता जेमतेम दोन तास उरलेले असताना मतदार घराबाहेर पडणार की नाही, याबाबत उत्सुकता आहे.
नागालँडमध्ये सध्या भाजप आणि मित्रपक्षांची सत्ता आहे. येथील एका लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे. राज्यातील ईस्टर्न नागालँड (Nagaland) पीपल्स ऑर्गनायझेशनने मतदानावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला मतदारांनीही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिल्याचे चित्र आहे.
नागालँडमधील पूर्वेकडील जिल्ह्यांसाठी केंद्र सरकारने दिलेली आश्वासने पाळली नसल्याचा आरोप करत संघटनेने बहिष्काराचे आवाहन केले होते. राज्यात विधानसभेच्या (Assembly) 60 जागा असून, त्यापैकी जवळपास 20 मतदारसंघांमध्ये बहिष्काराचा परिणाम जाणवत आहे. जवळपास सहा जिल्ह्यांतील या मतदारसंघांमध्ये संघटनेचे वर्चस्व मानले जाते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
निवडणूक आयोगाच्या (Election Commission) आकडेवारीनुसार सहा जिल्ह्यांमध्ये शून्य टक्के मतदान झाले आहे. संघटनेने गुरुवारीच निवडणूक आयोगाला बहिष्काराबाबत माहिती दिली होती. त्यानंतर नागालँडच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी संघटनेला कारणे दाखवा नोटीस बजावत कारवाईचा इशारा दिला होता.
संघटनेनेही बहिष्काराचा निर्णय प्रत्येकाचा वैयक्तिक असल्याचे उत्तर आयोगाला दिले आहे. पूर्वेकडील भागात शांतता राहावी, कायदा-सुव्यवस्था बिघडू नये आणि येथील नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी बहिष्काराचे आवाहन केल्याचे संघटनेने आयोगाला दिलेल्या पत्रात म्हटले होते.
दरम्यान, नागालँडमध्ये लोकसभेचा एकच मतदारसंघ आहे. या मतदारसंघात भाजपच्या नेतृत्वाखाली मित्रपक्ष आणि इंडिया आघाडीमध्ये सरळ लढत होत आहे. त्यामुळे आता मतदानावरील बहिष्काराचा फटका कुणाला बसणार, हे निकालातूनच स्पष्ट होणार आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.