Lok Sabha Election News : मतदानादिवशीच भाजपला झटका; कमलनाथ यांच्या शिलेदाराची घरवापसी

Congress News : मागील लोकसभा निवडणुकीत मध्य प्रदेशात काँग्रेसला केवळ छिंदवाडा मतदारसंघात विजय मिळाला होता. हा मतदारसंघही खेचून आणण्यासाठी भाजपने मागील काही दिवसांत काँग्रेसमधील अनेक पदाधिकाऱ्यांना पक्षात घेतले आहे.
Kamal Nath
Kamal NathSarkarnama

Madhya Pradesh News : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election News) विजयासाठी भाजपसह काँग्रेसने कंबर कसली आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानाआधी प्रामुख्याने भाजपने काँग्रेसमधील अनेक नेत्यांना फोडत आपल्याकडे खेचले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचा गड असलेला छिंदवाडा मतदारसंघही त्यातून सुटला नाही, पण मतदानादिवशीच भाजपला या मतदारसंघात मोठा झटका बसला आहे, तर कमलनाथ यांना दिलासा मिळाला आहे.

मागील लोकसभा निवडणुकीत मध्य प्रदेशात काँग्रेसला केवळ छिंदवाडा मतदारसंघात विजय मिळाला होता. कमलनाथ (Kamal Nath) यांचे पुत्र नकुलनाथ या मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. या निवडणुकीतही ते नशीब आजमावत आहेत. कमलनाथ यांचा गड असलेल्या या मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी भाजपने (BJP) अनेक नेत्यांना पक्षात आणले. त्यामध्ये छिंदवाडा महापालिकेचे महापौर विक्रम अहाके यांचाही समावेश होता.

Kamal Nath
PM Narendra Modi News : मोहम्मद शमीच्या बॉलिंगची आठवण अन् मोदींची जोरदार ‘बॅटिंग’

अहाके यांनी मात्र मतदानादिवशी भाजपला धक्का दिला. त्यांनी यू टर्न घेत काँग्रेसमध्ये (Congress) घरवापसी केली आहे. त्यांनी एक व्हिडिओ जारी करत कमलनाथ आणि नकुलनाथ यांचे कौतुक करत काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहनही केले आहे. मध्य प्रदेश काँग्रेसकडूनही हा व्हिडिओ ट्विट करण्यात आला असून, भाजपला करारा झटका असल्याचे म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अहाके यांनी एक एप्रिलला भाजपमध्ये प्रवेश केला होता. मुख्यमंत्री मोहन यादव आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष व्ही. डी. शर्मा यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला होता. विक्रम हे कमलनाथ यांचे निकटवर्ती मानले जातात. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशामुळे त्यांना झटका बसला होता. पण काही दिवसांतच कमलनाथ यांनी भाजपवर पलटवार केला आहे.    

आज मध्य प्रदेशात छिंडवाडासह सहा लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. नकुलनाथ यांच्या विरोधात भाजपने विवेक बंटी साहू यांना उतरवले आहे. या मतदारसंघात भाजपने यापूर्वीच काँग्रेसला खिंडार पाडले आहे. आज विक्रम यांच्या घरवापसीमुळे नकुलनाथ यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी त्यांच्यासाठी ही लढत सोपी नसल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

R

Kamal Nath
Lok Sabha Election News : पहिल्या टप्प्यातील 102 मतदारसंघांत 2019 मध्ये कुणाचा होता दबदबा?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com