Narendra Modi Sarkarnama
देश

Lok Sabha Election Exit Poll : 'मोदीराज'ची हॅटट्रीक; तर इंडिया आघाडीला 'अच्छे दिन'? काय सांगतात एक्झिट पोलचे आकडे...

NDA Vs India Alliance : भाजपप्रणित एनडीएला कमीत कमी 350 तर जास्तीत जास्त 415 जागांवर विजयाचे भकित आहे. तर इंडिया आघाडीला कमीत कमी 96 तर जास्तीत जास्त 166 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला आहे.

Sunil Balasaheb Dhumal

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचा धामधूम संपताच देशात कोण किंग ठरणार याचे आडाखे बांधण्याची विविध संस्थांनी आपले एक्झिट पोल जाहीर केले आहेत. त्यानुसार नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची हॅटट्रीक साधणार असल्याचा अंदाज आहे. तर गत वेळी जेमतेम शंभरी गाठलेल्या इंडिया आघाडीला यावेळी अच्छे दिन येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी यंदा येणार तर मोदीच असेच काहीसे चित्र निर्माण झाल्याचे बोलले जात असले तरी ते 4 जून रोजी स्पष्ट होणार आहे.

देशात सात टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडली. यावेळी मोदींचा वारू रोखण्यासाठी देशभरातील विरोधक एकवटले. त्यांची मोट बांधण्यासाठी सुरुवातीला बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, अरविंद केजरीवाल, उद्धव ठाकरे, शरद पवार, राहुल गांधींनी पुढाकार घेतला होता. यातील नितीशकुमारांनी ऐन लोकसभेच्या तोंडावर पलटी मारत मोदींची साथ देण्याचा निर्णय घेतला. अशा अनेक घटनांनी या निवडणुकीत मोठी रंगत आणली होती.

आता मतदान संपल्यानंतर विविध संस्थांनी लोकसभा जागांबाबत अंदाज जाहीर केले आहेत. त्यानुसार मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होत असून विरोधकांच्याही बाहुत बळ वाढणार असल्याचे स्पष्ट होत आहे. एक्झिट पोलमध्ये सर्व संस्थांनी भाजपप्रणित एनडीएला कमीत कमी 350 तर जास्तीत जास्त 415 जागांवर विजयाचे भकित आहे. तर इंडिया आघाडीला कमीत कमी 96 तर जास्तीत जास्त 166 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला आहे.

India Today - Axis

एनडीए : 361 - 401

इंडिया आघाडी : 131 - 166

इतर : 8-20

ABP - C Voter

एनडीए : 353 - 383

इंडिया आघाडी : 152 - 182

इतर : 4 -12

Tv 9 Pollstrat

एनडीए : 342

इंडिया आघाडी : 166

इतर : 35

Jan ki Baat

एनडीए : 362 - 392

इंडिया आघाडी : 141 - 161

इतर : 10 - 20

Matrize

एनडीए : 353 - 368

इंडिया आघाडी : 118 - 133

इतर : 43 - 48

D Dynamics

एनडीए : 371

इंडिया आघाडी : 125

इतर : 47

PMARQ

एनडीए : 359

इंडिया आघाडी : 154

इतर : 30

Today's Chanakya

एनडीए : 385 - 415

इंडिया आघाडी : 96 -118

इतर : 27 - 45

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT