Rohini Acharya, Lalu Prasad Yadav Sarkarnama
देश

Lok Sabha Election News : लालूंसमोरच त्यांच्या मुलीच्या पराभवासाठी पक्षातील नेत्याकडून प्रचार; नेमकं काय घडलं?

Rohini Acharya News : रोहिणी आचार्य या अनेक वर्षे सिंगापूरमध्ये होत्या. आता लालूंनी त्यांनाही निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे त्यांचे संपूर्ण कुटुंबच आता राजकारणात आले आहे.

Rajanand More

Bihar News : देशभरात लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election News) जोरदार प्रचार सुरू असून, विविध पक्षाच्या नेत्यांनी आपल्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी कंबर कसली आहे. उमेदवारांना निवडून देण्यासाठी मतदारांना आवाहन केले जात आहे. पण आपल्याच पक्षाच्या उमेदवाराला पराभूत करण्याचे आवाहन एका नेत्याने चक्क लालू प्रसाद यादव यांच्यासमोर केल्याचा प्रकार घडला. हा उमेदवार दुसरा-तिसरा कुणी नसून लालूंच्या कन्या आहेत.

लालूंच्या कन्या रोहिणी आचार्य (Rohini Acharya) यांना राष्ट्रीय जनता दलाच्या (RJD) तिकिटावर सारण मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारासाठी बुधवारी लालूंच्या (Lalu Prasad Yadav) उपस्थितीत सभा झाली. त्यामुळे कार्यकर्त्यांसह नेत्यांमध्ये उत्साह होता. याच उत्साहाच्या भरात पक्षाचे आमदार सुनील कुमार सिंह यांनी थेट रोहिणी आचार्य यांचा पराभव करायचा आहे, असे विधान केले.

सिंह म्हणाले, ‘आरजेडीच्या नेत्यांना मी इतकेच सांगू इच्छितो की, रोहिणी आचार्य यांना इतक्या मतांनी हरवा की...’ आपली चूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सिंह यांनी डॅमेज कंट्रोल करताना रोहिणी आचार्य यांना विजयी करा, इतिहासात त्याची नोंद व्हायला हवी, असे आवाहन केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, रोहिणी आचार्य या डॉक्टर आहेत. त्यांचा विवाह 2002 मध्ये अमेरिकेतील सॉफ्टवेअर इंजिनिअर समरेश सिंह यांच्याशी झाला. निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यापूर्वी त्या अनेक वर्षे सिंगापूरमध्ये होत्या. त्या लालूंच्या दुसऱ्या कन्या आहेत. त्याआधी मीसा भारती या राजकारणात (Political News) आल्या आहेत. लालूंची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना किडनी प्रत्यारोपण करण्यास सांगितले होते.

रोहिणी आचार्य यांनी लालूंना किडनी दान करत त्यांना जीवनदान दिले आहे. किडनी प्रत्यारोपण सिंगापूरमध्ये झाले होते. त्यानंतर त्या बिहारमधील राजकारणात चांगल्याच सक्रिय झाल्या. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या विरोधकांवर सातत्याने निशाणा साधत होत्या. आता थेट लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरून त्यांनी विरोधकांना आव्हान दिले आहे.

R  

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT