Dimpal Yadav, Kangna ranvat, Supriya Sule, Praniti Shinde  Sarakrnama
देश

Lok Sabha Election Result News : लोकसभेतील 'वुमन पॉवर'ला धक्का; महिला खासदारांचा घसरला टक्का

Lok Sabha Election Result : गेल्या काही निवडणुकीपासून महिला खासदारांची संख्या पाहिली तर प्रत्येक निवडणुकीगणीस संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे निवडणूक लढविणाऱ्या महिला उमेदवारांची संख्या वाढत आहे.

Sachin Waghmare

Lok Sabha Election News : मोदी सरकारने निवडणुकीपूर्वीच संसदेत महिला आरक्षण विधयेक मंजूर केले. संसदेत महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतरची ही पहिली निवडणूक होती. महिलांना लोकसभा आणि विधानसभेत एक तृतियांश जागा राखीव ठेवण्याची तरतूद या कायद्यात आहे. हा कायदा अद्याप लागू झालेला नाही.

येणाऱ्या काळात महिला खासदारांची संख्या वाढणार असे चित्र दिसत होते. मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत गेल्या निवडणुकीच्या तुलनेत चित्र बदलले असून देशातील महिला खासदारांची संख्या घटल्याचे दिसत आहे. यावेळेस महिला खासदारांची टक्केवारी 13 टक्के इतकी आहे.

2019 च्या निवडणुकीत 78 महिला खासदार निवडून आल्या होत्या तर या निवडणुकीत केवळ 74 महिला खासदार निवडून आल्या आहेत. गेल्या निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तुलनेत महिला खासदारांची संख्या घटल्याचे दिसत आहे.

गेल्या काही निवडणुकीपासून महिला खासदारांची संख्या पाहिली तर प्रत्येक निवडणुकीगणीस संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे निवडणूक लढविणाऱ्या महिला उमेदवारांची संख्या वाढत आहे.

2009 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत 556 महिला रिंगणात होत्या. त्यापैकी 69 महिला विजयी झाल्या होत्या. 2014 झाली 668 महिला उमेदवार रिंगणात होत्या. त्यापैकी 62 महिला खासदार विजयी झाल्या होत्या. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 726 महिला रिंगणात होत्या, त्यापैकी 78 महिला विजयी झाल्या तर 2024 मध्ये झालेल्या निवडणुकीत 797 महिला उमेदवाराने निवडणूक लढवली होती. त्यापैकी 74 जणांना विजय मिळवता आला.

महिला खासदारांच्या प्रमाणात घट

भाजपने सर्वाधिक 69 महिलांना तिकीट दिलं होतं. तर काँग्रेसने 41 महिलांना तिकीट दिलं होतं. या 74 महिला खासदारामध्ये भाजपच्या (Bjp) सर्वाधिक 30 महिला आहेत तर काँग्रेसच्या 14 महिला विजयी झाल्या. तृणमूल काँग्रेस 11, समाजवादी पक्ष 4, डीएमके 3, जेडीयू 2, एलजीपी 2 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट (Sharad Pawar), वायएसआर, आरजेडीच्या प्रत्येकी एक महिला खासदार विजयी झाल्या आहेत. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत हे प्रमाण कमी झाले आहे.

राज्यात महिला खासदारांचे प्रमाण कमी

महाराष्ट्रातून गेल्या वेळेस नऊ महिला खासदार विजयी झाल्या. मात्र, यावेळी सातच महिला खासदार विजयी झाल्या आहेत. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत देशातून दोन तर राज्यातून दोन महिला खासदार कमी निवडून आल्या आहेत. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत विजयाचे प्रमाण कमी झाले आहे.

SCROLL FOR NEXT