Sunil Tatkare News : अजितदादांची 'पत' राखूनही सुनील तटकरेंची मंत्रिपदाची संधी हुकली ?

Lok Sabha Election Result : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाट्याला मिळणाऱ्या एकमेव मंत्रिपदी खासदार प्रफुल पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
Ajit Pawar, Prafull Patel, Sunil Tatkare
Ajit Pawar, Prafull Patel, Sunil TatkareSarkarnama

Ncp Politcs : लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठा पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे महायुतीमधील तीन घटक पक्षांना मोठा फटका सहन करावा लागला आहे. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार तिसऱ्यांदा सत्तेत येत आहे. त्यामुळे आता केंद्रीय मंत्रिपदावर कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अजित पवार गटाकडून लोकसभेत एक जागी विजय मिळवून देणारे रायगडचे खासदार सुनील तटकरे यांची मंत्रिपदाची संधी हुकणार आहे. राष्ट्रवादीच्या वाट्याला मिळणाऱ्या एकमेव मंत्रिपदी राज्यसभेचे खासदार प्रफुल पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. (Sunil Tatkare News)

Ajit Pawar, Prafull Patel, Sunil Tatkare
Uddhav Thackeray News : गड गमावलेले ठाकरेंचे शिलेदार 'मातोश्री'वर, सांगितलं पराभवाचे नेमके कारण

लोकसभा निवडणूक निकाल लागल्यानंतर आता धुरळा बसतानाच केंद्रात एनडीए आघाडीचे सरकार आल्याने सर्वच घटक पक्षांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. केंद्रातील मोदी सरकारचा रविवारी शपथविधी होणार असल्याने महायुतीमधील तीन घटक पक्षांना आता किती मंत्रिपद मिळणार यावरून मंथन सुरु झाले आहे.

महायुतीमधील तीन घटक पक्ष असलेल्या भाजपने (BJP) 28 जागा लढवत 9 जागा जिंकल्या तर शिवसेना शिंदे गटाने 15 जागा लढवत 7 जागी विजय मिळवला तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने 4 जागी निवडणूक लढवत रायगड लोकसभेच्या एकाच जागेवर विजय मिळवला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाट्याला दोन मंत्रिपद येतील, असे वाटत होते. मात्र, त्यांच्या वाट्याला केवळ एकच मंत्रिपद येण्याची शक्यता आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा विजय मिळवत खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे असलेली एकमेव जागा कायम राखली होती. दुसरीकडे बारामती, शिरूर व धाराशिव लोकसभा मतदारसंघात पक्षाला दारुण पराभव स्वीकारावा लागला असताना सुनील तटकरे यांनी रायगडमधून विजय मिळवून देत पक्षाला आधार दिला.

लोकसभा निवडणुकीत रायगडाचा गड राखल्याने केंद्रात मंत्रिपदाची बक्षिसी मिळेल, असे सर्वांना वाटत होते. मात्र, सर्वांच्या अपेक्षेवर पाणी फिरले जाण्याची शक्यता अधिक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाट्याला आलेले हे एकमेव मंत्रिपद राज्यसभेचे खासदार प्रफुल पटेल यांना मिळण्याची शक्यता अधिक आहे. प्रफुल पटेल यांना यापूर्वी केंद्रातील मंत्रिपदाचा अनुभव आहे. त्यामुळे या पदावर त्यांचीच वर्णी लागण्याची शक्यता अधिक आहे.

Ajit Pawar, Prafull Patel, Sunil Tatkare
Sanjay Shirsat News : भुमरेंना लीड देत शिरसाटांनी केला मंत्री पदाचा मार्ग मोकळा..

त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळात समावेशाची शक्यता कमी

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे हे राज्यातील प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांना केंद्रात मंत्रीपद मिळण्याची शक्यता कमीच आहे. एकीकडे संघटनात्मक जबाबदारी असल्याने तर दुसरीकडे सुनील तटकरे यांच्या कन्या अदिती तटकरे या राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री आहेत. त्यामुळेही त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता कमी आहे.

Ajit Pawar, Prafull Patel, Sunil Tatkare
Raosaheb Danve : रावसाहेबांचा 'अजब अंदाज', पराभवानंतर देखील ...

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com