Narendra Modi, Mallikarjun Kharge Sarkarnama
देश

Lok Sabha Election 2024 : राज्या-राज्यांतला आकडा सांगत, 'असं' येणार काँग्रेसचं बहुमताचं सरकार; 'या' बड्या नेत्याचा दावा

Congress Political : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपकडून 400 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा दावा केला जात असला तरी बहुमत मिळणार नसल्याचे सांगत त्यांनी पीएम मोदी यांच्याकडून करण्यात येणाऱ्या घोषणेतील हवाच काढली.

Sachin Waghmare

Loksabha Election : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी मतदान होत असताना सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप करण्यात व्यस्त आहेत. त्यातच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपकडून 400 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा दावा केला जात असला तरी बहुमत मिळणार नसल्याचे सांगत त्यांनी पीएम मोदी यांच्याकडून करण्यात येणाऱ्या घोषणेतील हवाच काढली. दुसरीकडे या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवली आहे.

देशात या निवडणुकीत भाजपचा (Bjp) सर्वात मोठा पराभव होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) 400 जागाहून अधिक जागा जिंकण्याचा दावा करीत आहेत. यावर काँग्रेसचे (Congress) अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी आश्चर्य व्यक्त केले.

कर्नाटकातील कलबुर्गी येथे पत्रकाराशी ते बोलत होते. या लोकसभा निवडणुकीत जनतेने इंडियाला चांगला पाठिंबा दिला आहे. ही निवडणूक जनता आणि पंतप्रधान मोदी यांच्यात आहे. लोक वाढत्या महागाई, बेरोजगारीमुळे कंटाळले आहेत. त्यामुळे नाराज झालेले मतदार मोदी यांच्या पाठीशी राहतील, असे वाटत नाही. (Mallikarjun kharage News)

यंदा मतदार नाराज असून सीबीआय व ईडी यांसारख्या संस्थेचा गैरवापर करून भाजप सरकार चालवत आहे. त्यामुळे जनता प्रचंड नाराज आहे. इंडिया आघाडीला मतदाराचा मोठा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे इंडिया आघाडीला बहुमत मिळणार असल्याचे खर्गे यांनी स्पष्ट केले.

तेलंगणात काँग्रेसला 2019 मध्ये केवळ दोन जागा मिळाल्या होत्या. मात्र, येथे काँग्रेसच्या जागा येत्या काळात वाढणार आहेत. दुसरीकडे केरळमध्ये काँग्रेसला जास्त जागा मिळणार आहेत. त्यासोबतच महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 24 पेक्षा अधिक जागा मिळणार आहेत. तर राजस्थानमध्ये आम्ही शून्य होतो. यावेळी काँग्रेसला सात ते आठ जागा मिळतील.

मध्यप्रदेशात काँग्रेसच्या जागा वाढणार आहेत तर छत्तीसगडमध्ये जागा वाढतील. कर्नाटक राज्यात 2019 मध्ये एकही जागा मिळाली नव्हती. मात्र, आता या ठिकाणी काँग्रेसला चांगल्या जागा मिळू शकतील, असा दावा खरगे यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जवळपास सर्वच राज्यात आमच्या जागा वाढत असताना भाजप कोणत्या आधारावर 400 जागा मिळण्याचा दावा करीत आहेत, हे समजून येत नाही. निकाल काय लागणार ? हे पाहण्यासाठी सर्वांना चार जूनची वाट पाहावी लागणार असल्याचे खर्गे यांनी सांगितले.

काँग्रेसला बहुमत मिळेल

इंडिया आघाडीला किती जागा मिळतील, अशी विचारणा केली असता निश्चित संख्या सांगू शकत नाही. तसा जागाचा अंदाज वर्तविणे कठीण आहे. राजकारणात अशी मोजणी फारच कमी होते. मात्र काँग्रेसला बहुमत मिळेल. भाजपचा सर्वच राज्यात पराभव होत आहे. त्यामुळे भाजपला 400 पेक्षा जास्त जागी विजय मिळवताना अडचण येईल, असेही खर्गे यांनी स्पष्ट केले.

SCROLL FOR NEXT