Lok Sabha Elections News bjp news Sarkarnama
देश

Lok Sabha Elections News : या मंत्र्यांना लढवावी लागणार लोकसभेची निवडणूक ; दोनवेळा राज्यसभेवर..

सरकारनामा ब्यूरो

BJP News : देशात पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यासाठी सर्वच पक्ष आपली रणनीती करण्यात व्यग्र आहेत. भाजपकडून सर्वच मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची चर्चा सुरु आहे. दोन वेळा राज्यसभेचे खासदार राहिलेल्यांना भाजप पुन्हा संसदेत जाण्याची संधी देत नाही, त्यांना त्यांच्या स्थानिक मतदारसंघातून निवडून येणे गरजेचे असते.

ज्या मंत्र्यांनी यापूर्वी कधीही लोकसभा निवडणूक लढवली नाही, अशा मंत्र्यांना आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या मैदानात भाजप उतविणार आहे. या मंत्र्यामध्ये विदेशमंत्री एस जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, केंद्रीयमंत्री पियुष गोयल, मनसुख मांडविया, धर्मेंद्र प्रधान, भूपेंद्र यादव आदींच्या नावांचा समावेश आहे.

एस जयशंकर - सध्याचे विदेशमंत्री सुब्रह्यण्यम जयशंकर गुजरातमधून राज्यसभेचे खासदार आहेत. राज्यसभेतील त्यांचा कार्यकाळ अजून बाकी आहे. मोदी सरकारमध्ये २०१९ मध्ये ते विदेशमंत्री झाले आहेत. या वर्षीं त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जयशंकर हे अमेरिका, चीन आदी देशांमध्ये राजदूत राहिले आहेत. त्यांचे शिक्षण दिल्लीत झाले आहे. आगामी लोकसभेसाठी त्यांना दिल्लीतून उमेदवारी मिळणार आहे.

निर्मला सीतारमण - अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा जन्म तामिळनाडू येथील आहे. त्या अर्थशास्त्राच्या पदवीधर आहेत. त्यांनी जेएनयू येथून एमफिल केलं आहे. अर्थमंत्री होण्यापूर्वी त्या देशाच्या सरंक्षणमंत्री होत्या. त्या कर्नाटकमधून राज्यसभेच्या खासदार आहेत. २००३ मध्ये त्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य होत्या,

मनसुख मांडविया-गुजरातमधील मांडविया हे सध्या आरोग्यमंत्री आहेत. २००२मध्ये त्यांनी २८ वर्षीय गुजरात विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. गुजरातमधील सर्वात तरुण विधानसभा आमदार म्हणून त्यांचा रेकॉर्ड आहे. २०१८मध्ये दुसऱ्यांदा राज्यसभेवर खासदार म्हणून ते निवडून आले आहेत.

पीयूष गोयल-पीयुष गोयल हे मोदी सरकारमध्ये उद्योगमंत्री आहेत. कोरोना काळात ते रेल्वेमंत्री होते. २०१० मध्ये ते पहिल्यांदा राज्यसभा खासदार झाले. २०१६ मध्ये दुसऱ्यांदा ते राज्यसभेचे खासदार झाले.

अश्विनी वैष्णव-आयटी तज्ज्ञ अश्विनी वैष्णव रेल्वे मंत्री आहेत. त्यांचा जन्म जोधपूर (राजस्थान) येथील आहे. २०१९ मध्ये ते ओडिशामधून राज्यसभेवर खासदार झाले आहेत.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT