Amit Shah flying kiss remark : लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे भाषण झाले. यादरम्यान त्यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. राहुल गांधी यांचे अधिवेशन काळातील परदेश दौरे, महत्वाच्या विधेयकांवर न बोलणे, लोकसभेतील उपस्थिती यावरून शहांनी निशाणा साधला.
अमित शाह यांनी राहुल गांधी यांच्या वागणुकीवरून टीका केली. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकसभेत घेतलेली गळाभेट, सहकारी खासदाराला डोळा मारणे यावर बोलतानाच फ्लाईंग किसचाही मुद्दा काढला. मला यावर बोलतानाही संकोच वाटत असल्याचे अमित शहा म्हणाले. त्यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले.
काँग्रेससह विरोधी बाकांवरील अनेक खासदारांनी अध्यक्षांच्या आसनासमोरील मोकळ्य जागेत येत जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यांनी अमित शाह यांनी माफी मागावी अशा जोरदार घोषणा दिल्या. विरोधकांचा आक्रमकपणा पाहून अमित शाह यांनी आपण बोललेलो काही शब्द असंसदीय असतील तर ते कामकाजातून काढून टाकावेत, असे तालिका अध्यक्षांना सांगितले. तालिका अध्यक्षांनीही ते शब्द काढून टाकले जातील, असे आश्वासन दिले.
तालिका अध्यक्षांनी सांगूनही विरोधी सदस्य शांत झाले नाहीत. त्यामुळे अमित शहा यांना गदारोळातच भाषण पूर्ण करावे लागले. विरोधकांकडून फ्लाईंग किसच्या मुद्यावर आक्षेप घेण्यात आला होता. यापूर्वी आणण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावादरम्यान राहुल गांधी यांनी भाषण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या जागेवर जात मिठी मारली होती. त्यानंतर त्यांनी सहकारी सदस्याला डोळा मारला होता. त्याची बरीच चर्चा झाली होती. तसेच सभागृहातून बाहेर पडताना फ्लाईंग किस केल्याचा आरोपही झाला होता.
दरम्यान, अमित शाह यांचे भाषण संपल्यानंतर अध्यक्षांविरोधातील अविश्वास प्रस्तावावर गदारोळातच मतदान घेण्यात आले. विरोधक शांत राहण्यास तयार नव्हते. अमित शहांनी माफी मागावी, अशी मागणी केली जात होती. गदारोळातच तालिका अध्यक्षांनी प्रस्ताव मतदानाला आणला आणि आवाजी मतदानाने हा अविश्वास प्रस्ताव नामंजूर करण्यात आला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.