Adv. Asim Sarode Sarkarnama
देश

Lok Sabha Security Breach : …म्हणून अमोल शिंदेच्या बाजूने लढणार! असीम सरोदेंनी सांगितले कारण...

Amol Shinde : संसदेबाहेर घोषणाबाजी आणि रंगीत फटाके जाळल्याचा आरोप अमोलवर आहे.

Rajanand More

Asim Sarode News : लोकसभेत घुसखोरी केल्याप्रकरणी आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या कटाचा मास्टरमाईंड ललित झा याला शुक्रवारी अटक करण्यात आल्याने अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर 'यूएपीए' कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींमध्ये महाराष्ट्रातील लातूर येथील अमोल शिंदे याचाही समावेश आहे. पुण्यातील अॅड. असीम सरोदे हे न्यायालयात त्याच्या बाजूने लढणार आहेत. यामागचे कारण त्यांनी सांगितले आहे.

अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींपैकी सागर शर्मा (Sagar Sharma) आणि मनोरंजन डी (Manoranjan D.) या दोघांनी लोकसभेत (Lok Sabha) घुसखोरी केली होती. तर अमोल व नीलम यांनी संसदेबाहेर (Parliament) घोषणाबाजी करत रंगीत फटाके फोडले. अमोल हा लातूर (Latur) जिल्ह्यातील असून स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. पण अनेकदा प्रयत्न करूनही नोकरी मिळत नसल्याने तो निराश होता. सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून त्याचा इतर सहकाऱ्यांशी संपर्क झाला होता.

दरम्यान, अॅड. असीम सरोदे यांनी अमोलच्या बाजूने लढण्याची घोषणा केली आहे. याविषयी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, संसद ही आपला अभिमानाचे प्रतिक आहे. निवडून आलेले सर्व लोकप्रतिनिधी तिथे बसतात. त्यामुळे अमोल शिंदे व इतरांनी केलेले कृत्य चुकीचेच आहे. त्यासाठी त्यांना शिक्षाही व्हायला हवी. पण त्यांच्यावर ज्या कायद्यांअंतर्गत गुन्हे दाखल कऱण्यात आले आहेत, ते चुकीचे आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

चुकीच्या कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आल्याने मी अमोल शिंदे याच्यासोबत असून त्याची कायदेशीर बाजू मांडण्यात मदत करणार आहे. एफआयआरमध्ये लावण्यात आलेली कलमे योग्य आहेत की नाही, हे मी पाहीन. अमोल शिंदे आणि इतर जण बेरोजगारी आणि महागाईचा मुद्दा पुढे आणण्याचा प्रयत्न करत होते, असे अॅड. सरोदे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, घुसखोरी प्रकरणाचा मास्टरमाईंड असलेल्या ललित झा याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. ललित झा याने या घटनेचा व्हिडिओ त्याच्या एनजीओ पार्टनरला पाठवला होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. घटना घडल्यापासून तो फरार होता. अखेर शुक्रवारी तो दिल्ली पोलिसांना शरण आला. संसदेच्या आत आणि बाहेर गेलेल्या चौघांचे मोबाईल घेऊन तो पळून होता असेही तपासात समोर आले होते.

(Edited By - Rajanand More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT