Chhagan Bhujbal : मी फार मोठी लोकं अंगावर घेतलीत, तू किस झाड की पत्ती है! भुजबळांचे जरांगेना चॅलेंज

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे आणि भुजबळांमधील वाद सुरूच...
Manoj Jarange Patil, Chhagan Bhujbal
Manoj Jarange Patil, Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामधील वाद आता विकोपाला पोहचला आहे. दोघांकडून एकमेकांना आव्हानाची भाषा केली जात आहे. शुक्रवारी सकाळी जरांगे यांनी भुजबळांना उद्देशून माझ्या नादी लागू नका, नाहीतर उरलेले केसही गळतील, अशी बोचरी टीका केली. त्याला काही मिनिटांतच भुजबळांनीही प्रत्युत्तर देत जरांगेंना डिवचले. ‘तू काय मी फार मोठे मोठे लोकं अंगावर घेतले आहेत. तू किस झाड की पत्ती है,’ असे भुजबळ म्हणाले आहेत.

मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची पत्रकार परिषद सुरू असतनाही भुजबळांनीही (Chhagan Bhujbal) नागपूरात (Nagpur) माध्यमांशी संवाद साधला. आजही त्यांनी जरांगे यांची झुंडशाही सुरू असल्याचे सांगत सरकारसह लोकप्रतिनिधींनी ठोस भुमिका घेण्याचे आवाहन केले. भुजबळ म्हणाले, निवडणुका (Election) आहेत आणि प्रत्येक लोकप्रतिनिधीला वाटते, आपल्या मराठा (Maratha) समाजाची मते मिळवण्यासाठी भुजबळांविरोधात बोलले पाहिजे. आता हे बोलतात की, ओबीसीला (OBC) धक्का न लावता आरक्षण देऊ. पण अगोदर कुणबी प्रमाणपत्र वाटत आहात, मग धक्का लागला आहे.

Manoj Jarange Patil, Chhagan Bhujbal
Manoj Jarange: 'अल्टीमेटम'च्या आदल्या दिवशी जरांगेंची तोफ बीडमध्ये धडाडणार

एवढेच नाही तर ओबीसीमध्ये आल्यानंतर नोकऱ्या, शिक्षण आणि राजकीय आरक्षणही आपोआपच लागू होणार आहे. वंजारी, माळी आदी आता निवडुकीतही निवडून येणार नाहीत. हे सगळे असूनही लोकं बोलायला घाबरत आहेत. फक्त आमच्याविरुध्द बोलायचे. हे सगळे लोकप्रतिनिधींचे सुरू आहे. एखाद-दुसरे लोकप्रतिनिधी यावर उघडपणे बोलत आहेत. पण बहुतांश जण फक्त भुजबळ मंत्री असतानाही बाहेर दोन समाजात रोष पसरवत आहेत, असे बोलतात. पूर्ण मराठा समाजाला मी दोष देत नाही. झुंडशाहीच्या मार्गाने मराठा आरक्षणाचा बुरखा पांघरून चालेली लोकं आम्हाला पसंत नाहीत. मी भूमिका घेतल्यामुळे जे भोगावे लागेल, त्यासाठी मी तयार आहे, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जरांगे यांनी १७ तारखेपर्यंत दिलेल्या अल्टीमेटवर बोलताना भुजबळ म्हणाले, कुठल्याही सरकारला कुणीही व्यक्ती कधी अशाप्रकारची धमकी देत होतं का, सरकारला वेठीस धरत होता का, देशात मोठमोठी आंदोलने झाली, पण कुणी अशा तारखा देत होते का. उद्या ते कोर्टालाही तारखा देतील. एकदा सवय झाली असा विध्वंस करण्याची तर ते वाढतच जाईल. शासन आणि यंत्रणेने खंबीरपणे उभे राहत मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण कसे देता येईल, यासाठी प्रयत्न करायला हवेत.

Manoj Jarange Patil, Chhagan Bhujbal
Haribhau Bagade News : ...म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीने मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही; हरिभाऊ बागडेंचा गौप्यस्फोट!

फडणवीस काय मला बोलायला सांगणार...

देवेंद्र फडणवीस हे भुजबळांना बोलायला सांगत असल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे. त्यावर बोलताना भुजबळ म्हणाले, माझे वय 76 आहे. त्यातील 35 वर्ष ओबीसींसाठी काम करतोय. मंडल आयोग आला. त्यावेळी फडणवीस आमदारही नव्हते. मी शिवसेना सोडल्यानंतर ते आमदार झाले. ते मला काय सांगणार. बाळासाहेब ठाकरे, पवार साहेबांनीही मला कधीही काय बोलायचे हे सांगितले नाही. आता मला कुणी तरी सांगावे आणि बोलावे अशी परिस्थिती नाही. माझे निर्णय माझे असतात, मी माझे बोलतो. त्याचे परिणाम भोगण्याची माझी तयारी आहे.

(Edited By - Rajanand More)

Manoj Jarange Patil, Chhagan Bhujbal
Maratha Reservation: 17 डिसेंबरपूर्वी सरकारने सांगावं, अन्यथा...; जरांगे पाटलांचा सरकारला पुन्हा इशारा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com