Lok Sabha Security Breach Gurpatwant Singh Pannun Sarkarnama
देश

Lok Sabha Security Breach: धमकी खरी ठरवल्यानंतर पन्नूने जाहीर केली संसदेतील घुसखोरांसाठी 10 लाखांची मदत

Gurpatwant Singh Pannun: पन्नू याने याने 13 डिसेंबर किंवा त्याआधी भारताची संसद हादरून जाईल, अशी धमकी दिली होती.

Mangesh Mahale

Parliament Security Breach: देशाच्या संसदेच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचे समोर आले असून हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजावेळी तीन अज्ञात व्यक्ती सभागृहात घुसल्याची घटना बुधवारी घडली. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना आज (गुरुवारी) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

या चारही आरोपींना कायदेशीर लढाई लढण्यासाठी खलिस्तानी दहशतवादी गट शीख फॉर जस्टिस (SFJ) चा प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू याने 10 लाख रुपयांची मदत केल्याचे जाहीर केली आहे.

संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच दोन जणांनी सभागृहात घुसखोरी केली तर दोघांनी संसद परिसरात स्मोक कॅडल जाळून सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. यात कटात सहा जण सामील असल्याचा दिल्ली पोलिसांना संशय आहे. चार जणांना UAPA कलमांअंतर्गत अटक करण्यात आली आहे. आज दुपारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

सहा डिसेंबर रोजी खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंतसिंह पन्नू याने याने एका व्हिडीओच्या माध्यमातून 13 डिसेंबर किंवा त्याआधी भारताची संसद हादरून जाईल, अशी धमकी दिली होती. भारतीय यंत्रणांनी मला मारण्याचा कट रचला पण त्यात ते यशस्वी झाले नाहीत.

आता 13 डिसेंबर किंवा त्याआधी संसदेवर हल्ला करून याचे उत्तर दिले जाईल, असे तो म्हणाला होता. त्यानंतर काल (बुधवारी) संसदेत तीन अज्ञात व्यक्ती घुसल्याने आणि त्यांनी गॅस सारखा पदार्थ स्पे केल्याने हा संसदेवर झालेला गॅस हल्ला आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

संसद सुरक्षा भंग प्रकरणात सहा जण सामील होते, अशी माहिती समोर आली आहे. हे सहा जण गुरुग्राममध्ये रात्री थांबले होते. तिथे या सहा जणांची बैठक झाल्याची माहिती मिळाली आहे. आरोपी विक्रमच्या घरीच हे सहा जण थांबले होते. तिथेच या सहा जणांनी सर्व कट रचला.

या घटनेमागील मास्टरमाईंड कोण आहे? यावर पोलिसांनी तपासाची सुत्रे फिरवली आहे. अमोल, सागर, विक्रम, ललित, मनोरंजन, नीलम अशी सहा जणांची नावे समोर आली आहेत. आम्ही विद्यार्थी आहोत. बेरोजगार आहोत. हे सरकार हुकूमशाही करत असल्याचे देखील नीलमने सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT