Lok Sabha Security Breach sarkarnama
देश

Lok Sabha Security Breach : संसदेत घुसखोरीचा हा होता 'प्लॅन बी'

Sudesh Mitkar

Delhi News : दिल्ली पोलिसांनी संसदेची सुरक्षा भंग केल्याप्रकरणी केलेल्या तपासात ललित झा याचे मुख्य सूत्रधार म्हणून नाव पुढे आले आहे. त्याला गुरुवारी रात्री पोलिसांनी पकडले. पटियाला हाऊस कोर्टाने ललितला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

यावेळी पोलिसांनी न्यायालयाला सांगितले, या प्रकरणामागे मोठे षडयंत्र आहे, हे उघड करण्यासाठी ललित झाची कोठडीत चौकशी करणे आवश्यक आहे. चौकशी दरम्यान ललित झा ने संसदेतील घुसखोरीसाठी त्याच्या कडे प्लॅन बी देखील होता असे सांगितले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सुरक्षेचा भंग करण्यासाठी आरोपींनी अनेक बैठका घेतल्या होत्या. त्यांना देशात अराजक माजवायचे होते, जेणेकरून ते सरकारला त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यास भाग पाडू शकतील. कटाचा एक भाग म्हणून त्याने पुरावे नष्ट करण्यासाठी इतर आरोपींचे फोन स्वतःच्या ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याने जयपूरहून दिल्लीला जाताना वाटेत त्याचा फोन देखील फेकून दिला होता.

संसदेवरील हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त ललित झा यांचे सहकारी नीलम आणि अमोल यांनी संसदेबाहेर धूर पसरवला आणि घोषणाबाजी केली. त्यानंतर त्यांचे दोन सहकारी सागर आणि मनोरंजन लोकसभेच्या व्हिजिटर गॅलरीतून उडी मारून खासदारांपर्यंत पोहोचले आणि तेथेही त्यांनी बुटांमधून धुराचे डबे काढून धूर पसरवला.

हा प्लॅन फसला असता तर ललितने प्लॅन बी ही बनविल्याचे पोलिसांनी सांगितले. नीलम आणि अमोल फेल झाले तर त्यांच्या जागी महेश आणि कैलाश तयार होते. दरम्यान आरोपींचे शत्रू देश किंवा दहशतवादी संघटनेशी संबंध आहेत का, याचा शोध घेण्याची गरज असल्याचे पोलिसांनी सांगितले. ललित झा यांचा माओवाद्यांशी संबंध आहे का, याचा तपास देखील पश्चिम बंगाल पोलिसांनी सुरू केला आहे.

(Edited By -Sudesh Mitkar)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT