Lok Sabha Security Breach : संसद घुसखोरी प्रकरणात 'कल्याण कनेक्शन'; पोलिस अॅक्शन मोडवर..

Lok Sabha Security Breach : 'संसदभवन घुसखोरीचे धागेदोरे लातूरनंतर आता कल्याणपर्यंत पोहचले...'
Lok Sabha Security Breach :
Lok Sabha Security Breach : Sarkarnama
Published on
Updated on

Kalyan News : संसद भवनातील घुसखोरी प्रकरणी कल्याण पोलिस अॅक्शन मोडवर आले आहेत. त्यातून कल्याणमधील अहिल्याबाई चौकातील फटाका विक्रेत्यांची चौकशी सुरू करण्यात येत आहे. दिल्ली पोलिसांकडून विचारणा होण्याआधीच कल्याण पोलिसांनी चौकशी मोहीम हाती घेतली आहे. त्या तपासाची व्याप्ती वाढून कार्यवाहीला वेग आला आहे. पोलिसांनी चौकशीचा वेग वाढवला आहे. यामुळे आता संसदेतील घुसखोरीचे धागेदोरे लातूरपाठोपाठ कल्याणपर्यंत पोहचल्याचे दिसत आहे. (Latest Marathi News)

स्मोक कँडल घुसखोरांनी आणले कुठून याचा तपास पोलिस करत आहेत. पोलिसांच्या प्राथमिक तपासात जी माहिती प्राप्त झाली आहे, त्या प्रमाणे अमोल शिंदे या घुसखोराने कल्याण इथे फटाका स्टॉलमधून स्मोक कँडल खरेदी केल्याचे आढळून आले आहे. यानंतर आता कल्याण पोलिस सतर्क झाले असून, पोलिस अँक्शन मोडवर आले आहेत.

Lok Sabha Security Breach :
Parliament Security Breach: संसद घुसखोरीचा मास्टरमाईंड ललित झा अटकेत; चौघांचे मोबाईल घेऊन पळून...

कल्याणमधील विविध दुकाने फटाका दुकानांमध्ये चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. कल्याणमधील कोणत्या फटाका दुकानात आणि कधी स्मोक कँडल विकत घेतला आहे, याचा आता तपास करण्यात येत आहे. आरोपी अमोल शिंदे याने ही खरेदी केली होती का? की कोणत्या साथीदाराला खरेदी करण्यासाठी पाठवले होते, याचा शोध घेण्यात येत आहे, मात्र त्याने कोणत्या दुकानातून याची खरेदी केली, याची अजूनही स्पष्टता झालेली नाही.

काय आहे प्रकरण ?

लोकसभेत बुधवारी दुपारी (दि. १३ ऑक्टो) रोजी धक्कादायक घटना घडली. लोकसभेच्या प्रेक्षक गॅलेरीत बसलेल्यापैकी दोघांनी थेट खासदार बसतात त्या ठिकाणी उडी मारली होती. तसेच स्मोक कँडल जाळल्या. त्यामुळे एकच घबराट निर्माण झाली होती. उडी मारणाऱ्यांपैकी एकाने खासदारांच्या डेस्कवरून लोकसभा अध्यक्षांच्या आसानाकडे जाण्याच्या प्रयत्न केला होता.

Lok Sabha Security Breach :
Lok Sabha Security Breach: संसदेत घुसखोरी करणाऱ्यांची मुंबईत खरेदी

संसेदच्या नव्या वास्तूमध्ये सुरू असलेले हे दुसरेच अधिवेशनाततच असा गंभीर प्रकार घडला. राजेंद्र आगरवाल यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून कामकाज पाहात होते. लोकसभेत कामकाज सुरू असताना अचानकपणे दोघांनी उड्या मारून तिथे प्रवेश केल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. तातडीने सुरक्षारक्षकांनी या सर्वांना घेराव घालून त्यांना ताब्यात घेतले. समोर सुरू असलेला हा प्रकार बघताच पीठासीन अधिकाऱ्यांनी सभागृहाचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब केले.

आरोपींची नावे काय ?

‘नहीं चलेगी नहीं चलेगी.. तानाशाही नहीं चलेगी…’ अशी घोषणाबाजी या घुसखोर युवकांकडून करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपी सागर शर्मा हा लखनऊचा, तर मनोरंजन हा कर्नाटकातील बेंगळुरूचा रहिवासी आहे. संसदेबाहेर अटक करण्यात आलेली महिला नीलम कौर ही हरियाणाच्या जिंद येथील रहिवासी आहेत. तर, २५ वर्षीय अमोल शिंदे हा महाराष्ट्रातील लातूरचा रहिवासी आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com