New Delhi : लोकसभेत सोमवारी अध्यक्ष ओम बिर्ला, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, आणि संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. राहुल गांधींनी भाषण करताना अध्यक्षांना चॅलेंज केल्याचा दावा रिजिजू यांनी केला. तर तुम्ही संसदेत खोटं बोलू नका, असे म्हणत बिर्लांनी राहुल यांच्या भाषणावर आक्षेप घेतला. त्यावर राहुल यांनीही रिजिजू यांच्यावर पलटवार केला.
राहुल यांनी लोकसभेत भाषणादरम्यान विविध मुद्यांवर सरकावरवर हल्लाबोल चढवला. यादरम्यान त्यांनी मोहन भागवत, अदानी-अंबानी यांची नावे घेतली. त्यावर अध्यक्षांनी आक्षेप घेत सदस्य नसलेल्या व्यक्तींची नावे घेऊ नयेत, अशी सूचना केली.
मग राहुल यांनी अदानी-अंबानींची नावे घ्यावीच लागतील, तुम्हीच पर्याय सुचवा, असे उत्तर दिले. हे उत्तर ऐकून बिर्ला यांनीही त्यांना संसदेच्या नियमांची आठवण करून दिली. त्यानंतर राहुल यांनी अदानी आणि अंबानी यांचा उल्लेख A1 आणि A2 असा केला.
शेतकऱ्यांना संसदेत येऊ दिले नाही, असा आरोपही राहुल यांनी केला होता. त्यानंतर तुम्ही संसदेत खोटं बोलू नका, असे बिर्ला यांनी राहुल यांना सुनावलं. त्यावर काँग्रेसच्या सदस्यांनी गदारोळ घातला. राहुल सत्य बोलत असल्याचे सदस्यांचे म्हणणे होते. त्यानंतर राहुल यांनीच त्यावर खुलासा केला.
शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ मला भेटण्यासाठी येणार होते. पण त्यांना आत सोडले जात नसल्याचे मला समजले. मी तिथे गेल्यानंतर गेटवरून त्यांना आत घेऊन आलो. हे सत्य असून इतर काही विसंवाद झाला असेल तर मला माहिती नाही, असे राहुल यांनी स्पष्ट केले.
राहुल यांच्या या खुलाशानंतर बिर्ला म्हणाले, संसदीय व्यवस्थेचे काही नियम असतात. कुणाला येऊ द्यायचे, कुणाला येऊ द्यायचे नाही, हा अध्यक्षांचा अधिकार असतो. संसदेच्या आवारात सदस्यांशिवाय बाहेरील कुणालाही मीडियाशी बोलता येत नाही. शेतकरी बोलल्याचे सांगत बिर्ला यांनी नियमांचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवला. त्यावर राहुल यांनीही लगेच ही तांत्रिक बाब मला माहिती नसल्याचे राहुल म्हणाले.
राहुल यांच्या विधानांवर किरण रिजिजूही भडकले. ते म्हणाले, तुम्ही संसदेचे नियम मानत नाही, अध्यक्षांचा अपमान करता. तुम्हाला नियम माहिती नाहीत. विरोधी पक्षनेत्याला नियम माहिती नाही, हे खूप दुर्देवी आहे. अध्यक्षांना चॅलेंज करून तुम्ही संसदेची प्रतिष्ठा कमी केली आहे, अशी टीका रिजिजू यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.