New Delhi : लोकसभा निवडणुकीत पुन्हा एनडीएला बहुमत मिळाल्याने नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता सोमवारपासून लोकसभेचे अधिवेशन सुरू होत आहे. अठराव्या लोकसभेचे हे पहिलेच अधिवेशन असेल.
सोमवारी पहिल्या दिवशी पंतप्रधान मोदींसह इतर मंत्र्यांना खासदारकीची शपथ दिली जाईल. त्यानंतर खासदारांना सदस्यत्वाची शपथ दिली जाईल. त्याआधी भाजपचे खासदार भर्तृहरी महताब यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदाची शपथ देतील. त्यानंतर महताब हे सकाळी 11 वाजता लोकसभेच्या कामकाजाला सुरूवात करतील.
पंतप्रधान मोदी आणि मंत्र्यांना शपथ दिल्यानंतर आसाममधील खासदारांना पहिल्यांदा शपथ देतील. या यादीत आसाममधील खासदारांचा पहिला तर पश्चिम बंगालमधील खासदारांचा शेवटी क्रमांक असेल. इंग्रजी मुळाक्षरांप्रमाणे संबंधित राज्यातील खासदारांना शपथ दिली जाईल. सोमवारी 280 खासदारांना शपथ दिली जाईल. तर उर्वरित खासदार मंगळवारी शपथ घेतील.
दरम्यान, सभागृहाचे काम सुरू झाल्यानंतर हंगामी अध्यक्षांच्या नियुक्तीवरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. काँग्रेससह इंडिया आघाडीतील इतर पक्षांकडून महताब यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला जाऊ शकतो. काँग्रेसने के. सुरेश सर्वात ज्येष्ठ सदस्य असल्याने या पदासाठी योग्य असल्याचा दावा केला आहे. पण भाजपने हा दावा फेटाळून लावला आहे. त्यामुळे सभागृहात पहिलाच दिवस वादाचा ठरू शकतो.
लोकसभा अध्यक्षपदासाठी 26 जूनला निवडणूक होणार आहे. विरोधकांनी उमेदवार न दिल्यास ही निवडणूक बिनविरोध होईल. विरोधकांकडून उपाध्यक्षपदाची निवडणूक लढण्याचे संकेत देण्यात आले आहेत. दोन्ही पदांसाठी निवडणूक झाल्या. या निवडणुकीत एनडीए आणि इंडिया आघाडीच्या बाजूने नेमके किती खासदार आहेत, हे स्पष्ट होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.