Om Birla Narendra Modi Sarkarnama
देश

Video Lok Sabha Speaker : ओम बिर्लांकडे आहे खास गोष्ट! अभिनंदन करताना पंतप्रधान मोदींनी केले कौतुक

Narendra Modi on Newly Elected Lok Sabha Speaker Om Birla : ओम बिर्ला यांचे अभिनंदन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओम बिर्ला यांच्याकडे असलेल्या खास गोष्टीचे कौतुक केले.

Roshan More

Lok Sabha Speaker Election Update: लोकसभा अध्यक्षपदावर आवाजी मतदानाने ओम बिर्ला यांची निवड करण्यात आली. ओम बिर्ला यांचे अभिनंदन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओम बिर्ला यांच्याकडे असलेल्या खास गोष्टीचे कौतुक केले.

पंतप्रधान मोदी म्हणाले, आपल्या शास्त्रांमध्ये विनम्र आणि कार्यकुशल मनुष्य यशस्वी होतो असे म्हटले आहे. या गोष्टींसह आपल्याकडे 'गोड हसू' आहे. आपल्या चेहऱ्यावरील हे गोड हसू सदनाला प्रसन्न ठेवते.

लोकसभा अध्यक्षाचे काम अवघड असते. त्यामुळे सलग दुसऱ्यांदा कोणी अध्यक्ष होत नाही. किंवा निवडून देखील येत नाही. मात्र आपण सलग दुसऱ्यांदा निवडणूक जिंकला आहेत आणि अध्यक्ष देखील झाला आहात.

येणारे पाच वर्ष तुमचे मार्गदर्शन आम्हाला मिळेल. मी माझ्या कडून तसेच सदनाकडून आपले अभिनंदन करतो, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवनिर्वाचित अध्यक्ष ओम बिर्ला Om Birla यांचे अभिनंदन केले.

लोकसभा अध्यक्षांचे काम हे नवीन सदस्यांना देखील प्रेरणादायक ठरेल. ज्या प्रकारे त्यांनी आपल्या लोकसभा क्षेत्रात आरोग्य विषयक काम केले. विशेषता कोटाच्या ग्रामीण भागात ते अभिनंदनीय आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

खासदार म्हणून तुम्ही ज्या पद्धतीने काम करता ते जाणून घेण्यासारखे आहे, तुमच्याकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे, अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी Narendra Modi बिर्ला यांचे कौतुक केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT