Assembly Election 2024 : 2019 मध्ये भोपळाही न फोडणारी मनसे पुणे जिल्हा काबीज करण्याच्या तयारीत

MNS News : लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यभरामध्ये मनसेने आपले उमेदवार दिले नव्हते, त्याउलट त्यांनी महायुतीच्या उमेदवारांना आपला पाठिंबा दर्शवला होता.
raj thackeray
raj thackeraysarkarnama

Pune News : लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंच्या मनसेने पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मदारसंघाची चाचपणी सुरू केली आहे. तसेच, पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याच्या तयारीला मनसेने सुरुवात केली आहे. यासाठी खाजगी संस्थेकडून सर्वेक्षण करण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यभरामध्ये मनसेने ( MNS ) आपले उमेदवार दिले नव्हते, त्याउलट त्यांनी महायुतीच्या उमेदवारांना आपला पाठिंबा दर्शवला होता. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुका मनसे महायुतीसोबत आघाडी करून लढेल, असं मानलं जात आहे. तरी मनसेने सध्या तरी आपली स्वतंत्र तयारी करण्यास सुरुवात केली आहे.

महायुतीमध्ये भाजप, शिवसेना ( Shivsena ) आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मोठे पक्ष एकत्रित आले आहेत. या तीनही पक्षांचा आपल्याला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात यासाठी प्रयत्न असणार आहे. तसेच, रिपाईने देखील या निवडणुकीमध्ये दहा जागांची मागणी केली आहे. त्यामुळे महायुतीमध्ये जागा वाटपादरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये रस्सीखेच होणार हे जवळपास निश्चित आहे. अशा परिस्थितीमध्ये जरी मनसेने महायुतीसोबत ( Mahayuti ) जाण्याचा विचार केला तरी त्यांच्या वाट्याला किती जागा येणार हा प्रश्नच आहे. त्यामुळेच मनसेने सध्या तरी स्वतंत्र अशी विधानसभेची तयारी करण्यास सुरुवात केली आहे.

raj thackeray
MLA Sunil Tingre : टिंगरेंना टोमणा हाणत, मुळीकांनीं ठोकला विधानसभेवर दावा !

मनसेकडून राज्यातील 200 पेक्षा अधिक जागांचे सर्वे केले जाणार आहे. त्यामध्ये पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेने कसबा, हडपसर, कोथरूड, शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट या पाच विधानसभा मतदारसंघांमधून निवडणूक लढली होती. मात्र, त्यावेळी मनसेला अपेक्षित यश आलं नाही.

दरम्यान, आता मनसेने एका खाजगी संस्थेला विधानसभा निहाय सर्वेक्षण करण्याची जबाबदारी दिली आहे. त्या संस्थेने आपला पहिला अहवाल सादर केला असून दुसरा अहवाल पुढील महिन्यात सादर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मनसेचे राज्यातील पदाधिकारी प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये जाऊन त्या ठिकाणच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची चर्चा करून तेथील परिस्थिती, राजकीय गणितं, संभावित उमेदवार या सर्वांचा एकत्रित असा अहवाल तयार करून पक्षप्रमुखांना सादर करणार आहे.

raj thackeray
Mahavikas Aghadi News : हडपसरमध्ये आघाडीत बिघाडी! शिवसेनेच्या माजी आमदारानं दंड थोपटले; प्रशांत जगतापांचं टेन्शन वाढलं

यानुसार पुणे जिल्ह्यातील 21 जागांचे सर्वेक्षणाचं काम सुरू करण्यात आलं आहे. त्यामुळे महायुतीला महाविकास आघाडीबरोबरच मनसेच्या आव्हानालाही तोंड द्यावं लागणार असल्याचं बोललं जात आहे.


( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com