om birla  sarkarnama
देश

Om Birla : ओम बिर्ला मोदींच्या मंत्र्यावर भडकले, भर संसदेत झाप-झाप झापलं; नेमकं घडलं काय?

Budget Session 2024 : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला विरोधी पक्षांच्या खासदारांवर अन्याय करतात, असा आरोप सातत्यानं केला जातो. पण, आज अध्यक्ष बिर्ला यांनी सत्ताधारी पक्षातील मंत्र्यावर संतापल्याचे पाहायला मिळाले.

Akshay Sabale

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अर्थसंकल्पावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे. लोकसभेत गोंधळ आणि आरोप-प्रत्यारोपच्या फैरी झडत आहेत.

तसेच, लोकसभेतील सदस्यांना अध्यक्ष ओम बिर्ला ( Om Birla ) झापताना दिसतात. यातच मोदी सरकारमधील एका मंत्र्यावर अध्यक्ष बिर्ला चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळाले.

लोकसभेत भाजपचे बंगळुरू ग्रामीणचे खासदार डॉ. सी. एन. मंजूनाथ प्रश्न विचारत होते. यावेळी अध्यक्ष बिर्ला यांची नजर एका मंत्र्याच्या हावभावावर गेली. त्यानंतर अध्यक्ष बिर्ला यांनी मंत्र्याला झाप-झाप झापलं. पण, हे मंत्री कोण होते? कळू शकले नाही.

झालं असं की, संसदेत भाजप ( Bjp ) बंगळुरू ग्रामीणचे खासदार डॉ. सी. एन. मंजूनाथ प्रश्न विचारत होते. यावेळी एक मंत्री महोदय खिशात हात टाकून संसदेत आले. यावरून अध्यक्ष बिर्ला चांगलेच संतप्त झाले. अध्यक्ष बिर्ला म्हणाले, "मंत्रीजी हात खिशातून बाहेर काढा.... एक तर माननीय सदस्यांनो मी आपल्याला आग्रह करतो की, हात खिशात टाकून सभागृहात येऊ नका. ठीक आहे ना..."

यावेळी अध्यक्ष बिर्ला यांच्या मध्ये मंत्री महोदयांनी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अध्यक्ष बिर्ला आणखी भडकले. त्यांनी म्हटलं, "मंत्री महोदय आपण मध्येच का बोलत आहात? काय विचारायचे असेल तर सांगा? हात खिशात टाकण्यास आपण परवानगी द्याल का? दुसरी विनंती अशी की, जेव्हा एखादे सदस्य बोलत असतात, तेव्हा कुणीही त्याला क्रॉस करून समोर बसू नये. त्यांच्या मागे जाऊ बसावे."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT