Lok Sabha Session : केंद्रीय मंत्र्यांचे थेट लोकसभेतच काँग्रेस खासदाराला चहाचे आमंत्रण; ओम बिर्लांनी सुनावलं...

Parliament Session Manohar Lal Khattar Om Birla : लोकसभेत मनोहरलाल खट्टर यांनी कार्बन उत्सर्जनाबाबतच्या प्रश्नावर उत्तर देताना खासदारांना चहा पिण्याचे आमंत्रण दिले होते.
Manohar Lal Khattar, Om Birla
Manohar Lal Khattar, Om BirlaSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : लोकसभेत खासदार तसेच मंत्र्यांच्या विधानांवर अध्यक्ष ओम बिर्ला बारकाने लक्ष ठेऊन आहेत. सोमवारी तृणमूलचे खासदार अभिषेक बॅनर्जी, महुआ मोईत्रा यांना खडसावल्यानंतर त्यांनी मंगळवारी थेट केंद्रीय मंत्र्यांवरच निशाणा साधला.

लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर काँग्रेसचे खासदार मनिष तिवारी यांनी कार्बन उत्सर्जनाबाबत प्रश्न मांडला होता. त्यावर ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी उत्तर दिले. कार्बन ऊत्सर्जन हा आंतरराष्ट्रीय विषय असून भारतानेही एक टार्गेट निश्चित केले असून 2030 पर्यंत ते पूर्ण केले जाईल, असे खट्टर यांनी सांगितले.

Manohar Lal Khattar, Om Birla
Rahul Gandhi : अमित शाह यांच्यावरील टिप्पणी राहुल गांधींना भोवणार; कोर्टात हजर राहण्याचे आदेश

खट्टर एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी आपण एक महिनाच झाले, या सभागृहात आलो आहे. हा टेक्निकल विषय असल्याने आम्ही एकत्र बसून चहा पीत चर्चा करू, असे म्हणत खट्टर यांनी थेट मनिष तिवारी यांना चहाचे आमंत्रण दिले.

अध्यक्ष बिर्ला यांनी खट्टर यांनी या विधानावरच बोट ठेवत नाराजी व्यक्त केली. तसेच मंत्र्यांनी कधीही आपल्या उत्तरात चहा पिऊन उत्तर देऊ, असे बोलू नका. जे उत्तर दिले आहे ते ठीक आहे. चहा पीत उत्तर देऊ नका, असे बिर्ला यांनी सुनावलं.

Manohar Lal Khattar, Om Birla
Goa News : 'या' राज्यात दोनच जिल्हे; तिसऱ्या जिल्ह्यासाठी विधानसभा सभापती आग्रही

दरम्यान, सभागृहाचे कामकाज सुरू होताच संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी विरोधकांवर निशाणा साधला. काही सदस्यांकडून संसदेची मर्यादा पाळली जा नाही. संसदेच्या प्रतिष्ठेला तडा जाईल, अशी विधाने केली जात आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार अध्यक्षांना आहेत. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी रिजिजू यांनी केली.

बिर्ला यांनीही रिजिजू यांच्यानंतर सदस्यांना संसदेतील संकेत पाळण्याचे आवाहन केले. सभागृह नियमानुसार चालेल, त्यामुळे सदस्यांनी वादग्रस्त विधाने टाळवीत, असे बिर्ला यांनी सांगितले. बुधवारी अभिषेक बॅनर्जी यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी वादग्रस्त विधाने केली होती. त्यावर सत्ताधारी खासदारांनी आक्षेप घेतला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com