Satyendra Baitha sarkarnama
देश

Loksabha Election : गाढवावर बसून उमेदवारी अर्ज भरायला पोहचला उमेदवार, सगळेच झाले थक्क

Roshan More

संदीप चव्हाण

Loksabha Election : निवडणूक काळात मतदारांचे लक्ष वेधून घेण्यासाठी कोण काय फंडा वापरेल याचा नेम नाही. बिहारमधील गोपालगंजमध्ये एका अपक्ष उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी चक्क गाढवावर बसून जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचला. या उमेदावाच्या या आगळ्यावेगळ्या स्टंटने जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या नागरिकांचे लक्ष वेधून घेतलं.

बिहारमधील गोपालगंजमध्ये 25 मे रोजी मतदान होणार आहे. या जागेसाठी अनेक उमेदवारांनी अर्ज भरले पण एका उमेदवारानं आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी चक्क गाढवावर स्वार होऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. कुचाईकोट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील श्यामपूर गावात या अपक्ष उमेदवाराचे नाव आहे सत्येंद्र बैथा. गळ्यात हार घालून आणि गाढवावर स्वार होऊन उमेदवारी अर्ज Nomination form भरण्यास निघालेल्या या उमेदवाराला पाहाण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा एकच गर्दी झाली होती.

विशेष म्हणजे हे महाशय 2001 पासून सक्रिय राजकारणात Politics आहेत. त्यांनी मागील दोन लोकसभा निवडणुका देखील लढवल्या आहेत. बैथा यांची यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही निवड झाली होती. लोकांना मताच्या महत्त्वाची जाणीव करून देणे आणि उमेदवारांना विवेकीपणे निवडणे हा आपला गाढवावरून फिरण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी म्हटले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गोपालगंजमधील जवळपास प्रत्येक नेत्याने निवडणूक जिंकल्यानंतर आम्हाला मूर्ख बनवले असल्यामुळं ‘योग्य’ उमेदवाराला मत देण्यासाठी लोकांना संवेदनशील करण्याची हीच वेळ आहे, असेही बैथा यांनी सांगितले. “जनता को मुरख मत समझीये, अब नेता लोग को गधा जनता बनायेगी,” असा इशाराही त्यांनी दिला.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT