Lok Sabha Election 2024 Sarkarnama
देश

Election Commission : निवडणूक आयोगाने पहिल्या पाच टप्प्यातील मतदानाची एकूण आकडेवारी केली जाहीर!

Mayur Ratnaparkhe

Loksabha Election 2024 : एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदान आज(शनिवार) सुरू असताना, दुसरीकडे निवडणूक आयोगाने पहिल्या पाच टप्प्यात झालेल्या मतदानाची आकडेवारीच जाहीर केली आहे.

आपला रिपोर्ट सादर करत निवडणूक आयोगाने(Election Commission) हा दावाही केला आहे की, मतांच्या संख्येत काही बदल झालेला नाही. निवडणूक प्रक्रिया बिघडवण्यासाठी खोट्या अफवा पसरवणे हा एक प्रकारचा खेळ झाला आहे. या अगोदर निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात लोकसभा निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यातील मतदानानंतर 48 तासांच्या आत आपल्या वेबसाईटवर मतदानाचा डेटा अपलोड करण्याच्या मागणीला अयोग्य म्हटले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कारण, सर्वोच्च न्यायालयात(Supreme Court) ही मागणी बिगर सरकारी संघटना असोशिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स(एडीआर)ने केली होती. निवडणूक आयोगाने तर्क दिला होता की, असं केल्याने निवडणुकीच परिस्थिती बिघडू शकते.

ही आकडेवारी जाहीर करताना निवडणूक आयोगाने सांगितले की, पहिल्या टप्प्यात एकूण 66.14 टक्के, दुसऱ्या टप्प्यात 66.71टक्के, तिसऱ्या टप्प्यात 66.68 टक्के, चौथ्या टप्प्यात 69/16 टक्के आणि पाचव्या टप्प्यात 62.20 टक्के मतदान झाले आहे.

कोणत्या टप्प्यात किती मतदान झाले? -

पहिल्या टप्प्यात एकूण 166386344 मतदार होते आणि एकूण मिळून 110052103 लोकांना आपल्या मतदानांचा अधिकार बजावला होता. यामुळे पहिल्या टप्प्यातील मतदानाची टक्केवारी ही 66.14 टक्के होती.

दुसऱ्या टप्प्यात एकूण 158645484 मतदारांपैकी 105830572 जणांनी मतदान केले. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात एकूण 66.71 टक्के मतदान झाले.

तिसऱ्या टप्प्यात एकूण 172404907 मतदार होते, त्यापैकी 113234676 मतदारांनी मतदान केले होते. त्यामुळे या टप्प्यात 65.68 टक्के मतदानाची(voting) नोंद झाली होती.

चौथ्या टप्प्यात 69.16 टक्के मतदान झाले. एकूण 177075629 मतदारांपैकी 122469319 मतदारांनी मतदानाच हक्क बजावला होता.

पाचव्या टप्प्यात एकूण 89567973 मतदारांपैकी 55710618 मतदारांनी मतदान केले. त्यामुळे या टप्प्यात 62.20 टक्के मतदान झाले.

(Ediyted by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT